BCCI in Guinness Book: 'या' कारणामुळे 'बीसीसीआय'ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

सचिव जय शहा यांनी ट्विटरवरून दिली माहिती
BCCI in Guinness Book
BCCI in Guinness Book Dainik Gomantak
Published on
Updated on

BCCI in Guinness Book of World Records: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या भारतीय क्रिकेट नियामंड मंडळ (बीसीसीआय) ने आता चक्क गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

BCCI in Guinness Book
FIFA World Cup 2022 वर 'कॅमल फ्लू'चे संकट!चाहत्यांनी रहावे जागृत

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक चाहत्यांच्या उपस्थितीची नोंद झाली आहे. याच कारणामुळे बीसीसीआयला हा सन्मान लाभला आहे. आयपीएलच्या यंदाच्या सीझनमधील फायनल मॅचमध्ये आत्तापर्यंतच्या टी-20 सामन्यांमध्ये सर्वाधिक प्रेक्षकांची उपस्थिती नोंदवली गेली होती. हा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 29 मे 2022 रोजी झाला होता. या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला पराभूत करत आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती. गुजरात टायटन्सचे नेतृत्व हार्दिक पांड्या याने केले होते.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, टी-20 सामन्यासाठी 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद झाल्याने आनंद आणि अभिमान वाटत आहे. हे शक्य केल्याबद्दल क्रिकेट फॅन्सना खूप धन्यवाद.

BCCI in Guinness Book
Phillip Hughes: क्रिकेट इतिहासातील दुर्दैवी घटना; जेव्हा बाऊंसर लागल्याने ऑसी क्रिकेटरने गमावलेला जीव

या मॅचमध्ये 1 लाख 01 हजार 566 प्रेक्षक उपस्थित होते. अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियम 1982 मध्ये बनवले गेले होते. फेब्रुवारी 2021 हे स्टेडियम नव्याने साकारले गेले आणि स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले. हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com