मोठी बातमी ! जय शाह होणार ICC चे चेअरमन?

जय शाह ICC च्या पुरुष क्रिकेट समितीचे म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे प्रतिनिधी बनले आहेत.
BCCI Secretary Jai Shah
BCCI Secretary Jai ShahDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत मोठे पद मिळाले आहे. होय! जय शाह ICC च्या पुरुष क्रिकेट समितीचे म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे प्रतिनिधी बनले आहेत. जय शाह (Jai Shah) सध्या बीसीसीआयचे सचिव आहेत. तर बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यासोबत भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत आता जय शहाबाबत आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. (BCCI Secretary Jai Shah has become the representative of the ICC Men's Cricket Committee)

दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांच्याबाबत सध्याची सर्वात मोठी बातमी येत आहे की, ‘जय शाह आगामी काळात ICC म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनू शकतात. तथापि, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ऑक्टोबर 2022 पर्यंत विद्यमान अध्यक्ष असलेले ग्रेग बार्कले अध्यक्षपदावर कायम राहतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर नोव्हेंबरमध्ये आयसीसीच्या नव्या अध्यक्षाबाबत चर्चा होणार आहे. आयसीसीच्या एका सदस्याने गोपनीयतेच्या अटीवर पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले आहे.’

BCCI Secretary Jai Shah
IPLमधून निवृत्त होणारा रविचंद्रन अश्विन पहिला खेळाडू!

ICC चेअरमन होण्याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही

आयसीसीच्या पुढील अध्यक्षपदासाठी जय शाह यांचे नाव चर्चेत आले आहे. मात्र जय शाह यांनी किंवा त्यांच्या सूत्रांनी यास दुजोरा दिलेला नाही. अशा परिस्थितीत जय शाह आयसीसीचे पुढील अध्यक्ष बनतात की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

BCCI Secretary Jai Shah
BBL खेळणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरलेला उन्मुक्त चंद कोण आहे?

याशिवाय, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा (Rameez Raja) यांच्या दुबईमध्ये आज म्हणजेच 10 एप्रिल रोजी पाकिस्तान, भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील मालिका आयोजित करण्याच्या प्रस्तावाला आयसीसीने फारसे महत्त्व दिले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com