BCCI मध्ये 'या' मोठ्या पदांसाठी भरती, जाणून घ्या कोण कोण करू शकतो अर्ज

बीसीसीआयने मोठ्या पदासाठी अर्ज मागवले आहेत, त्यासाठी असलेले नियम जाणून घ्या.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

BCCI invites applications for Men’s Selection Committee post: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) काही महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. याबद्दल बीसीसीआयच्या ट्वीटरवर माहिती देण्यात आली आहे.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार भारतीय पुरुष संघाच्या निवड समीतीमध्ये एक पद रिक्त आहे. तसेच प्रत्येक राज्य क्रिकेट असोसिएशनसाठी स्पोर्ट्स सायन्स आणि मेडिसिन प्रमुख/अकादमी फिजिओ पदासाठीही भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.

त्याचमुळे या पदांसाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत. त्यासाठी बीसीसीआयने ट्वीट करत एक लिंकही दिली आहे. त्या लिंकवरून उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत.

निवड समीती सदस्याच्या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारिख 30 जून, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. तसेच स्पोर्ट्स सायन्स आणि मेडिसिन प्रमुख पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जुलै आहे.

Team India
World Cup 2023 India Schedule: BCCI चा वर्ल्डकपसाठी प्लॅन रेडी! चेन्नईत पहिली मॅच, तर भारत-पाकिस्तान 'या' दिवशी आमने-सामने

दरम्यान, निवड समीतीमध्ये फेब्रुवारीपासून एक जागा रिक्त आहे. फेब्रुवारीमध्ये स्टिंग ऑपरेशननंतर निवड समीतीच्या अध्यक्षपदावरून चेतन शर्मा यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यानंतर शिव सुंदर दास यांना निवड समीतीचे प्रभारी अध्यक्षपद देण्यात आले होते.

निवड समीती सदस्य पदासाठीची पात्रता निकष

बीसीसीआयने निवड समितीतील पदासाठी अर्ज करण्यासाठी नियमावलीही जाहिर केली आहे. बीसीसीआयने सांगितलेल्या पात्रता निकषानुसार अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कमीत कमी 7 कसोटी सामने खेळलेले असावेत किंवा 30 प्रथम श्रेणी सामने खेळलेले असावेत किंवा 10 वनडे आणि 20 प्रथम श्रेणी सामने खेळलेलेल असावेत. त्याचबरोबर कमीत कमी 5 वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असावी.

सध्या भारताच्या निवड समितीमध्ये शिव सुंदर दास यांच्याशिवाय सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन शरथ हे सदस्य आहेत.

Team India
India's Tour of West Indies: BCCI ने केली वेस्ट इंडिज दौऱ्याची घोषणा! पाहा संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

स्पोर्ट्स सायन्स आणि मेडिसिन प्रमुख पदासाठी निकष

स्पोर्ट्स सायन्स आणि मेडिसिन प्रमुख पदासाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय 50 पेक्षा अधिक नसावे, तसेच त्याने कमीत कमी मस्कुलोस्केलेटल फिजिओथेरपी/स्पोर्ट्स अँड एक्झरसाईज मेडिसिन/स्पोर्ट्स रिहॅबिलिटेशन/स्पोर्ट्स फिजिओथेरपी याचे पदवीचे शिक्षण घेतलेले असावे.

याशिवाय एखाद्या राज्य संघाचा फिजिओ म्हणून 5 वर्षांचा अनुभव असावा किंवा एखाद्या हाय-परफॉर्मन्स संघासह काम करण्याचा 8 वर्षांचा अनुभव असावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com