BCCI Central Contract: बीसीसीआयचा मास्टरस्ट्रोक! रोहित-विराटचं 'डिमोशन' तर शुभमन गिलचं टॉपचं प्रमोशन; सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर

BCCI Central Contract 2025-26: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2025-26 या आगामी हंगामासाठी खेळाडूंच्या वार्षिक कराराची (सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट) घोषणा केली असून यामध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत.
virat kohli & rohit-sharma
virat kohli & rohit-sharmaDainik Gomantak
Published on
Updated on

BCCI Central Contract: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2025-26 या आगामी हंगामासाठी खेळाडूंच्या वार्षिक कराराची (सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट) घोषणा केली असून यामध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. 1 ऑक्टोबर 2025 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीसाठी लागू होणाऱ्या या करारामध्ये पुरुष गटात 30, तर महिला गटात 21 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने 'ए प्लस' (A+) हा सर्वोच्च श्रेणीचा ग्रेड संपुष्टात आणला, ज्याचा थेट परिणाम रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या ग्रेडवर झाला. हे दोन्ही खेळाडू आता थेट 'बी' ग्रेडमध्ये आले आहेत, कारण त्यांनी कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून ते आता केवळ वनडे क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत.

या नव्या रचनेत 'ए' ग्रेड हा सर्वोच्च मानला गेला असून त्यामध्ये शुभमन गिल, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या तिघांना स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे, शुभमन गिलचे हे प्रमोशन मानले जात आहे. गिल सध्या भारताच्या वनडे आणि कसोटी संघाचे नेतृत्व असून तो तिन्ही फॉरमॅटमध्ये सातत्याने खेळत असल्याने त्याला टॉप ग्रेडमध्ये बढती देण्यात आली आहे. यापूर्वी, बुमराह आणि जडेजा 'ए प्लस' श्रेणीत होते, परंतु आता ही श्रेणीच नसल्याने ते 'ए' ग्रेडचे मानकरी ठरले आहेत. महिला क्रिकेटचा विचार करता, 'ए' ग्रेडमध्ये कर्णधार हरमनप्रीत कौरसह स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्स आणि दीप्ती शर्मा या खेळाडूंनी आपले स्थान कायम राखले आहे.

virat kohli & rohit-sharma
Team India Controversy: विराटच्या कसोटी निवृत्तीचं 'गंभीर' कनेक्शन? 'RO-KO'ला वनडेतून डच्चू देण्याची तयारी? 'कोल्ड वॉर'वर 'BCCI'चा मोठा खुलासा

'बी' श्रेणीमध्ये यावेळी अनेक बड्या नावांची वर्णी लागली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासोबतच केएल राहुल, हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत, कुलदीप यादव, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांचा या 10 खेळाडूंच्या यादीत समावेश आहे. यामध्ये वॉशिंग्टन सुंदर हा एकमेव असा खेळाडू आहे, जो सध्या भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये नियमितपणे खेळतो. बीसीसीआयने अनुभवी खेळाडूंना सन्मान देतानाच भविष्यातील कर्णधार आणि युवा फळीला प्राधान्य दिल्याचे या करारावरुन स्पष्ट होत आहे.

virat kohli & rohit-sharma
IPL 2025 मधून 'या' स्टार खेळाडूची हकालपट्टी? 'BCCI'नं दिला आदेश, केकेआरनं 9.20 कोटींना केलं होतं खरेदी VIDEO

सर्वात शेवटच्या म्हणजेच 'सी' ग्रेडमध्ये 16 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये नुकत्याच आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या युवा खेळाडूंना स्थान मिळाले आहे. टी-20 क्रिकेटमधील जगातील नंबर एक फलंदाज अभिषेक शर्मा आणि अव्वल फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती यांना 'सी' ग्रेडमध्ये स्थान देऊन बीसीसीआयने (BCCI) त्यांच्या कामगिरीची दखल घेतली आहे. निवृत्तीनंतर केवळ एकाच फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचे ग्रेड खाली येणे आणि सातत्याने तिन्ही फॉरमॅट खेळणाऱ्या खेळाडूंचे महत्त्व वाढवणे, हा बीसीसीआयचा नवा पॅटर्न या कॉन्ट्रॅक्टमधून अधोरेखित झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com