बंगळूर अखेर विजयपथावर तब्बल सात लढतीनंतर विजयी; चेन्नईयीनवर मात

बंगळूरने एका गोलच्या पिछाडीवरून विजयास गवसणी घालताना विश्रांतीला 2-1 अशी आघाडी घेतली होती
Football ISL

Football ISL

Dainik gomantak

Published on
Updated on

पणजी : इंडियन सुपर लीग (आयएसएल) (ISL) फुटबॉल (Football) स्पर्धेच्या आठव्या मोसमात तब्बल सात सामने विजयाविना राहिल्यानंतर बंगळूर एफसी संघ अखेर गुरुवारी विजयपथावर परतला. बचावफळीत वारंवार चुका केलेल्या चेन्नईयीन एफसीला शिक्षा करताना त्यांनी 4-2 फरकाने विजय मिळविला.

दक्षिण भारतातील दोन माजी विजेत्या संघातील सदर्न डर्बी वास्को येथील टिळक मैदानावर झाली. बंगळूरने एका गोलच्या पिछाडीवरून विजयास गवसणी घालताना विश्रांतीला 2-1 अशी आघाडी घेतली होती. स्पर्धेतील मोहिमेस विजयाने सुरवात करताना बंगळूरने 20 नोव्हेंबर 2021 रोजी बांबोळी येथे नॉर्थईस्ट युनायटेडला 4-2 फरकाने हरविले होते. त्यानंतर त्यांनी तीन बरोबरी नोंदविल्या, तर चार पराभव स्वीकारले.

<div class="paragraphs"><p>Football ISL</p></div>
U-19 Asia Cup 2021: टीम इंडिया अंतिम फेरीत, जेतेपदासाठी श्रीलंकेशी भिडणार

बंगळूरची मुसंडी

सामन्याच्या चौथ्याच मिनिटास किर्गिझस्तानच्या मिर्लान मुर्झाएव्ह याने मोसमातील दुसरा गोल नोंदवताना प्रेक्षणीय ड्रिबलिंग प्रदर्शित करत चेन्नईयीनला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 38 व्या मिनिटास ब्राझीलियन क्लेटन सिल्वा याने पेनल्टी फटक्यावर बंगळूरला बरोबरी साधून दिली. त्याचा हा मोसमातील पाचवा गोल ठरला. 43 व्या मिनिटास ब्राझीलियन बचावपटू एलन कॉस्ता याने चेन्नईयीनचा गोलरक्षक विशाल कैथ याच्या चुकीचा लाभ उठवत बंगळूरला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.

चार मिनिटांत दोन गोल

49 व्या मिनिटास रहीम अली याने चेन्नईयीनला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. या 21 आघाडीपटूचा हा यावेळच्या स्पर्धेतील पहिलाच गोल होता. त्यानंतर चेन्नईयीनच्या बचावफळीतील त्रुटींचा लाभ उठवत बंगळूरने चार मिनिटांत दोन गोल करून सामन्याची सूत्रे हाती घेतली. उदांता सिंगने 70 व्या मिनिटास गोलबरोबरीची कोंडी फोडल्यानंतर बदली खेळाडू प्रतीक चौधरी याने 74 व्या मिनिटास बंगळूरच्या (Bangalore) आघाडीवर शिक्कामोर्तब केले. उदांता, तसेच प्रतीक यांनी मोसमात प्रथमच गोल केला.

<div class="paragraphs"><p>Football ISL</p></div>
Indian super league: एटीके मोहन बागानने नोंदवला विजय

गुणतक्त्यात बंगळूरची प्रगती

बंगळूरने स्पर्धेतील दुसऱ्या विजयासह गुणतक्त्यात प्रगती साधली. ते आता दहाव्या क्रमांकावरून आठव्या स्थानी आले आहेत. एकंदरीत त्यांचा हा नऊ लढतीतील दुसरा विजय असून नऊ गुण झाले आहेत. चेन्नईयीनला तिसरा पराभव स्वीकारावा लागला, त्यामुळे त्यांचे आठ लढतीनंतर 11 गुण आणि सहावा क्रमांक कायम राहिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com