Maana Patel टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला स्विमर

भारतीय जलतरणपटू (Indian swimmer) माना पटेल (Maana Patel) टोकियो ऑलिम्पिकसाठी (Tokyo Olympics) पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला.
Maana Patel
Maana Patel
Published on
Updated on

नवी दिल्ली: भारतीय जलतरणपटू (Indian swimmer) माना पटेल (Maana Patel) टोकियो ऑलिम्पिकसाठी (Tokyo Olympics) पात्र ठरणारी तिसरी भारतीय जलतरणपटू आहे आणि पहिली भारतीय महिला ठरली आहे. भारतीय जलतरण महासंघ (SFI) ने आज शुक्रवारी ही माहिती दिली. (Backstroke swimmer Maana Patel has become the 1st indian female swimmer to qualify for Tokyo Olympics)

माना पटेलने रचला इतिहास

मानाने विद्यापीठाच्या कोट्यातन टोकियोमधील महिलांच्या 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये भाग घेणार आहे. मानापूर्वी श्रीहरी नटराज (100 मीटर बॅकस्ट्रोक) आणि साजन प्रकाश (200 मीटर बटरफ्लाय) यांनी नुकताच A क्वालीफिकेशन मार्क मिळवून ऑलिम्पिक बर्थ जिंकली होती.

एप्रिलमध्ये उझबेकिस्तान ओपन जलतरण स्पर्धेत माना पटेलची पहिल्या हंगामातील आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. तिने महिलांच्या 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये 1: 04.47 सेकंदात सुवर्णपदक जिंकले होते. गेल्या महिन्यात रोममधील सेट कोळी करंडक स्पर्धेत ऑलिम्पिकंमध्ये A पात्रता मिळवल्यानंतर टोकियो तिकीट मिळविणारा साजन हा पहिला भारतीय जलतरणपटू ठरला.

साजन आणि नटराज यांची कामगिरी

प्रकाश साजन (Sajan Prakash) ऑलिंम्पीकमध्ये ‘ए’ क्वालीफिकेशन टाइम मध्ये स्थान मिळविणारे पहिले भारतीय ठरले होते. रोममधील सेट्ट कोली करंडक स्पर्धेत पुरुषांच्या 200 मीटर बटरफ्लाय वर्गात 56.38 मध्ये स्थान मिळविणारा साजन प्रकाश पहिला भारतीय जलतरणपटू होता. रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये साजन टोकियो ऑलिम्पिकच्या ‘ए ’ स्टैंडर्डमध्ये 0.1 सेकंदात प्रवेश करू शकला. टोकियो ऑलिम्पिक 1 मिनिट 56.48 सेकंदात ‘ए ’ स्टैंडर्ड मध्ये स्थान मिळवणारा नटराज दुसरा भारतीय खेळाडू होता.

"ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणे ही आतापर्यंतची माझ्यासाठी सर्वात मोठी भावना आहे आणि तिथल्या उच्च स्तरावरील थ्रिलर्ससोबत कामगिरी बजावण्याची मला संधी मिळाल्याने मला खूप आनंद होत आहे, त्यासाठी मी तयारीही सुरू केली आहे, असे माना पटेल म्हणली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com