AUS vs NZ: स्टीव्ह स्मिथने मोडला मार्क वॉ चा रेकॉर्ड; रिकी पाँटिंग अजूनही नंबर 1

Steve Smith Record: पहिल्या डावात स्मिथ 31 धावा करुन बाद झाला, तर दुसऱ्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही आणि तो शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला.
Steve Smith Record
Steve Smith RecordDainik Gomantak

Steve Smith Record: न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीराची जबाबदारी पार पाडली, पण तो काही विशेष करु शकला नाही. पहिल्या डावात स्मिथ 31 धावा करुन बाद झाला, तर दुसऱ्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही आणि तो शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला.

अर्थात पहिल्या कसोटी सामन्यात स्मिथला आपल्या बॅटने विशेष काही करता आले नाही, पण क्षेत्ररक्षणात त्याने कमाल केली आणि दुसऱ्या डावात दोन झेल घेत त्याने मार्क वॉचा मोठा विक्रम मोडीत काढला.

स्टीव्ह स्मिथने मार्क वॉचा विक्रम मोडला

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात स्टीव्ह स्मिथने दोन झेल घेतले आणि विल यंग आणि केन विल्यमसन यांना बाद केले. यापैकी विल यंगचा झेल घेतल्यानंतर स्मिथ ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला, जिथे मार्क वॉ या स्थानी होता. पहिल्या डावात स्मिथने नॅथन लायनच्या चेंडूवर केनचा झेल घेतला तर ट्रॅव्हिस हेडच्या चेंडूवर विल यंगचा झेल टिपला.

Steve Smith Record
NZ vs AUS: ख्वाजाला सामन्यादरम्यानच का काढून टाकावे लागले बॅटवरील पक्ष्याचे स्टिकर, जाणून घ्या प्रकरण

दुसरीकडे, स्टीव्ह स्मिथने आता 108 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 182 झेल घेतले आहेत, तर मार्क वॉने त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीत खेळलेल्या 128 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 181 झेल घेतले आहेत. कांगारु संघाकडून कसोटीत सर्वाधिक झेल घेणाऱ्या फलंदाजांच्या यादीत माजी खेळाडू रिकी पाँटिंग पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने 168 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 196 झेल घेतले, तर आता स्मिथ दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. मार्क वॉ तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. या यादीत मार्क टेलर 157 झेलांसह चौथ्या स्थानावर आहे तर ॲलन बॉर्डर 156 झेलांसह पाचव्या स्थानावर आहे.

Steve Smith Record
AUS vs NZ: पॅट कमिन्सचा जलवा! अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा ऑस्ट्रेलियन कर्णधार; कपिल देव यांच्या क्लबमध्ये सामील

ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत सर्वाधिक झेल (विकेटकीपर नसलेले)

रिकी पाँटिंग - 168 कसोटीत 196 झेल

स्टीव्ह स्मिथ – 108 कसोटीत 182 झेल

मार्क वॉ - 128 कसोटीत 181 झेल

मार्क टेलर - 104 कसोटीत 157 झेल

ॲलन बॉर्डर - 156 कसोटींमध्ये 156 झेल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com