Asmita Khelo India Women’s League weightlifting
Asmita Khelo India Women’s League weightliftingDainik Gomantak

Asmita Khelo India Women’s League: खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंगला प्रतिसाद

धेंपो समुहाचे संचालक यतीश धेंपे यांनी स्पर्धेचे उदघाटन केले
Published on

गोवा वेटलिफ्टिंग असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अस्मिता खेलो इंडिया महिला लीग वेटलिफ्टिंग स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला. एकूण 34 महिला वेटलिफ्टर्सनी स्पर्धेत भाग घेतला.

कुजिरा-बांबोळी येथील धेंपो महाविद्यालय सभागृहात स्पर्धा झाली. धेंपो समुहाचे संचालक यतीश धेंपे यांनी स्पर्धेचे उदघाटन केले.

Asmita Khelo India Women’s League weightlifting
US Open: जोकोविच विक्रमी ग्रँडस्लॅम विजयापासून दोन पाऊले दूर! तब्बल 47 व्यांदा सेमी-फायनलमध्ये धडक

यावेळी भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे संयुक्त सचिव जयेश नाईक, गोवा वेटलिफ्टिंग संघटनेच्या अध्यक्ष अॅड. प्रियांका नाईक, गोवा क्रीडा प्राधिकरणाचे सीनियर प्रशिक्षक दयानंद हरमलकर यांची उपस्थिती होती.

कुंभारजुव्याचे आमदार राजेश फळदेसाई, म्हापशाच्या माजी नगराध्यक्ष रुपा भक्ता, धेंपो महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज कामत यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले

वैभवी उगाडेकर (४५ किलोगट), सारा प्निन्सन (४९ किलोगट), अंशवी बडिगर (५५ किलोगट), ऑलिव्हिया कुतिन्हो (५९ किलोगट), श्रेया नाईक (६४ किलोगट), चैतन्या देसाई (७१ किलोगट), साक्षी हळदणकर (७६ किलोगट), निकिता बेतकीकर (८१ किलोगट), तनुजा कुंकळकर (८७ किलोगट), इराम इर्शाद खत्री (८७वरील किलोगट) यांना विजेतेपद मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com