Kaur Singh Death: क्रीडाविश्वातून एक वाईट बातमी समोर येत आहे. एशियन गेम्स सुवर्णपदक विजेते बॉक्सर कौर सिंह यांचे गुरुवारी निधन झाले आहे. त्यांचे वयाच्या 74 व्या वर्षी दीर्घ आजाराने हरियाणातील कुरुक्षेत्रमधील एका हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
कौर सिंग हे 1971 मध्ये आर्मीमध्ये सामील झाले होते. ते 1972 मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धात राजस्थानच्या बाडमेर सेक्टरमध्ये आघाडीवर होते. त्यांना सेना पदकानेही गौरविण्यात आले. ते आर्मीमध्ये असतानाच बॉक्सिंगची सुरुवात केली होती. त्यांनी पहिल्यांदा सिनियर नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये 1979 साली भाग घेतला होता आणि सुवर्णपदकही जिंकले होते. त्यांनी त्यानंतर सलग चार वर्षे ही स्पर्धा जिंकली.
याचदरम्यान, त्यांनी मुंबईत झालेल्या 1980 सालच्या एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्येही सुवर्णपदक जिंकले होते. तसेच 1982 साली दिल्लीत झालेल्या एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यांच्या यशाचे महत्त्व लक्षात घेत त्यांना 1982 साली अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच त्यांना 1983 साली भारताचा चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.
कौर सिंह यांनी 1984 साली लॉस एंजेल्सला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतही सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी बॉक्सिंगमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर ते 1994 साली आर्मीतूनही निवृत्त झाले. त्यांना या काळात विशिष्ट सेवा पदकानेही गौरविण्यात आले होते.
त्यांच्या कारकिर्दीतील लक्षवेधी क्षण 1980 साली आला होता. दिल्लीतील चार फेऱ्यांच्या प्रदर्शनीय सामन्यात त्यांचा सामना दिग्गज मोहम्मद अली यांच्याविरुद्ध झाला होता. त्यामुळे मोहम्मद अली यांच्याविरुद्ध खेळणारे ते एकमेव बॉक्सर आहेत.
कौर सिंग यांनी पंजाबमधील काही लोकांबरोबर मिळून पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार सरकारकडे परत केले होते. त्यावेळी चालू असलेल्या शेतकरी अंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेतला होता.
त्यांनी निवृत्तीनंतर शेतीही केली. तसेच त्यांच्या गावाला अनेक सुविधा मिळवण्यासाठी नागरिकांना मदतही केली. महत्त्वाचे म्हणजे त्याच्या जीवनावर 2020 मध्ये चित्रपटही प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाच्या कारणाने चित्रपटाला उशीर झाला. त्यांच्या चित्रपटात करम बाथ या अभिनेत्याने कौर सिंह यांची भूमिका निभावली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.