Asia Cup 2022: पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरताच किंग कोहली रचणार इतिहास

Virat Kohli 100th T20 International: आता किंग कोहली 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak

2022 Asia Cup, Virat Kohli 100th T20 International: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 27 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या 2022 आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. माजी कर्णधार विराट कोहलीचेही आशिया कपसाठी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर त्याने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. आता किंग कोहली 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

कोहली 100 वा टी-20 सामना खेळणार

किंग कोहली पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरताच एक मोठा विक्रम आपल्या नावावर करेल. खरेतर, विराटने आतापर्यंत 99 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. अशा परिस्थितीत तो 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध 100 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. 100 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा कोहली हा भारताचा (India) दुसरा खेळाडू असेल. यापूर्वी रोहित शर्माने हा पराक्रम केला आहे. हिटमॅनने आतापर्यंत 132 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

Virat Kohli
Asia Cup 2022: केएल राहुल टीम इंडियात परतणार, या वेगवान गोलंदाजालाही मिळेल संधी

पहिला आशियाई खेळाडू होईल

किंग कोहली पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) मैदानात उतरताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळणारा आशियातील पहिला खेळाडू बनेल. याआधी जगात फक्त न्यूझीलंडचा (New Zealand) स्टार खेळाडू रॉस टेलर हा पराक्रम करु शकला होता. टेलरने सर्व फॉरमॅटमध्ये 100 किंवा त्याहून अधिक सामने खेळले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com