IND vs PAK: हार्दिक-इशान पास, तर बाकी फलंदाज फेल! भारताचे पाकिस्तानला 267 धावांचे आव्हान

Asia Cup 2023: भारतीय संघाकडून पाकिस्तानविरुद्ध हार्दिक पंड्या आणि इशान किशन यांनी अर्धशतके झळकावली, तर पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदीने 4 विकेट्स घेतल्या.
Hardik Pandya - Ishan Kishan
Hardik Pandya - Ishan KishanDainik Gomantak
Published on
Updated on

Asia Cup 2023 Pakistan Need 267 runs to win against India :

आशिया चषक 2023 स्पर्धेत शनिवारी (2 सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान संघात सामना होत आहे. कँडीतील पाल्लेकेले इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 50 षटकात धावांचे 267 धावांचे आव्हान ठेवले आहे.

पावसाची ये-जा सुरु असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारतीय संघाला सुरुवातीला शाहिन शाह आफ्रिदी आणि हॅरिस रौफ यांनी मोठे धक्के दिले.

भारताकडून कर्णधार रोहित शर्मा बरोबर शुभमन गिलने सलामीला फलंदाजी केली. मात्र, त्यांची जोडी फार काळ टिकू शकली नाही. रोहितला आफ्रिदीने 5 व्या षटकात त्रिफळाचीत केले. रोहितने 22 चेंडूत 11 धावा केल्या.

तसेच लगेचच 7 व्या षटकात आफ्रिदीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या विराट कोहलीला 4 धावांवर त्रिफळाचीत करत माघारी धाडले.

Hardik Pandya - Ishan Kishan
IND vs PAK: 'फक्त कोहली...कोहलीच...', विराटला पाहताच रौफने ऐकवली व्यथा

त्यानंतर श्रेयस अय्यरने धीम्यागतीने खेळणाऱ्या शुभमन गिलची साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्रेयस अय्यरही फार काळ टिकू शकला नाही. तो 10 व्या षटकात पुलचा फटका मारण्याच्या प्रयत्नात फखर जमानकडे झेल देत बाद झाला. त्याने 9 चेंडूत 2 चौकारांसह 14 धावा केल्या.

त्यानंतर रौफने 15 व्या षटकात गिललाही त्रिफळाचीत करत पॅव्हेलियनमध्ये धाडले. गिलने 32 चेंडूत 10 धावा केल्या.

यानंतर मात्र, इशान किशन आणि हार्दिक पंड्या यांनी भारतीय संघाला सावरले. या दोघांनीही एकमेकांची चांगली साथ देताना एकेरी-दुहेरी धावांबरोबरच आक्रमक फटके खेळण्यावरही भर दिला. त्यांनी शतकी भागीदारी करत भारताला 200 धावांचा टप्पा पार करून दिला.

मात्र, त्यानंतर दोघांचेही वैयक्तिक शतक हुकले. इशानला 38 व्या षटकात रौफने बाद केले. त्याचा झेल बाबर आझमने घेतला. इशान 81 चेंडूत 82 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले.

तसेच हार्दिकला शाहिन आफ्रिदीने 44 व्या षटकात 90 चेंडूत 87 धावांवर बाद केले. हार्दिकने या खेळीत 7 चौकार आणि 1 षटकार मारला. हार्दिक आणि इशान यांच्यात 138 धावांची भागीदारी झाली.

Hardik Pandya - Ishan Kishan
'आमच्याकडे शाहिन, नसीम, रौफ नाही, पण...' IND vs PAK सामन्यापूर्वी कर्णधार रोहितची प्रतिक्रिया

दरम्यान, आफ्रिदीने 44 व्या षटकातच रविंद्र जडेजालाही बाद केले. जडेजाने 22 चेंडूत 14 धावा केल्या. पुढच्याच षटकात शार्दुल ठाकूरला नसिम शाहने 3 धावांवर माघारी धाडले.

पण, यानंतर जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी झुंज देण्याचा प्रयत्न करत १९ धावांची भागीदारी केली. पण कुलदीप 4 धावांवर बाद झाला. दरम्यान, बुमराहने काही आक्रमक शॉट्सही खेळले. मात्र, मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात तो 49 व्या षटकात झेलबाद झाला. त्यामुळे भारताचा डाव 48.5 षटकात 266 धावांवर सर्वबाद झाला.

पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच हॅरिस रौफ आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com