Asia Cup 2023: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इशानला मिळणार डच्चू, केएल राहुल करणार पुनरागमन?

KL Rahul And Ishan Kishan: आशिया कपमध्ये टीम इंडियाचा पुढचा सामना पाकिस्तानविरुद्ध 10 सप्टेंबरला होणार आहे.
KL Rahul And Ishan Kishan
KL Rahul And Ishan KishanDainik Gomantak

KL Rahul And Ishan Kishan: आशिया कपमध्ये टीम इंडियाचा पुढचा सामना पाकिस्तानविरुद्ध 10 सप्टेंबरला होणार आहे. या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये यष्टिरक्षक म्हणून मोठा बदल पाहायला मिळू शकतो.

संघाचा मुख्य यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुलचे पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे राहुल आशिया चषक स्पर्धेतील पहिले दोन सामने खेळू शकला नाही. आता तो परतल्याने इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

दरम्यान, राहुलच्या अनुपस्थितीत इशान पहिल्या दोन सामन्यात यष्टिरक्षक म्हणून दिसला होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इशानने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 82 धावांची शानदार खेळी खेळली होती.

तथापि, असे असूनही 10 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) सामन्यात इशानला बेंचवर बसावे लागू शकते, कारण विकेटकीपर म्हणून केएल राहुल हा भारताचा पहिला पर्याय आहे.

KL Rahul And Ishan Kishan
Asia Cup 2023: पाकिस्तानने केला 'हा' मोठा रेकॉर्ड, आशिया चषक स्पर्धेत एकाच संघाविरुद्ध...

केएल राहुल नेटमध्ये सराव करत आहे

आशिया चषकातील पहिला सामना खेळण्यासाठी राहुल नेटमध्ये कसून सराव करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल संघात पाचव्या क्रमांकावर असेल. राहुलने नेटमध्ये उजव्या आणि डाव्या हाताच्या दोन्ही गोलंदाजांचा सामना केला.

पाकिस्तानविरुद्ध राहुलची कामगिरी

राहुल अत्तापर्यंत पाकिस्तानविरुद्ध फक्त एक वनडे खेळला आहे. 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकात त्याने पाकिस्तानविरुद्ध एकमेव एकदिवसीय डाव खेळला, ज्यामध्ये त्याने 57 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे, राहुलच्या या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.

KL Rahul And Ishan Kishan
Asia Cup 2023: रोमांचक विजयासह श्रीलंकेची सुपर-4 मध्ये धडक, अफगाणिस्तान आशियामधून कप बाहेर!

राहुल भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळतो

केएल राहुल भारतासाठी (India) तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो. त्याने आतापर्यंत 47 कसोटी, 54 एकदिवसीय आणि 72 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 2642 धावा, एकदिवसीय सामन्यात 1986 धावा आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 2265 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com