Asia Cup स्पर्धेसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, विराट, केएल राहुल परतणार

Team India: श्रीलंका क्रिकेट बोर्डाने यजमानपद कायम ठेवले.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

Asia Cup Tournament 2022: संयुक्त अरब अमिरातीमध्ये या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या आशिया चषक 2022 चे वेळापत्रक आशियाई क्रिकेट परिषदेने मंगळवारी (2 ऑगस्ट) जाहीर केले. ही स्पर्धा आधी श्रीलंकेत होणार होती, परंतु राजकीय आणि आर्थिक परिस्थितीमुळे श्रीलंकेला या स्पर्धेचे आयोजन करता आले नाही, त्यामुळे ती संयुक्त अरब अमिरातीत हलवण्यात आली. परंतु श्रीलंका क्रिकेट बोर्डाने यजमानपद कायम ठेवले.

दरम्यान, आशिया चषक 27 ऑगस्टपासून सुरु होत असून त्याचा अंतिम सामना 11 सप्टेंबरला होणार आहे. आशिया चषक स्पर्धेच्या वेळापत्रकानंतर त्यात सहभागी संघांनी आपापल्या संघांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानने बुधवारी (3 ऑगस्ट) आशिया चषकासाठी 15 जणांचा संघ जाहीर केला आहे.

Team India
Asia Cup 2022 Schedule: आशिया चषकमध्ये भारत-पाक आमने-सामने, वेळापत्रक जाहीर

त्याचवेळी, रिपोर्टनुसार, भारतीय संघाचीही (Team India) सोमवारी घोषणा होऊ शकते. आशिया चषक स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची अंतिम मुदत 8 ऑगस्ट आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तीन सामने खेळले गेले आहेत. चौथा आणि पाचवा सामना 6 आणि 7 ऑगस्टला होणार आहे. ही मालिका 7 रोजी संपेल आणि इनसाइडस्पोर्टच्या वृत्तानुसार, बीसीसीआय सोमवारी संघाची घोषणा करेल.

वेबसाइटनुसार, निवड समितीची बैठक मुंबईत होणार असून कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), प्रशिक्षक राहुल द्रविड व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यात सामील होतील. इंग्लंडविरुद्ध (England) पहिला टी-20 सामना खेळणाऱ्या अर्शदीपला टी-20 मधील तिन्ही सामन्यांमध्ये संधी देण्यात आली आहे. कपसाठीही त्याचे नाव चर्चेत आहे. अव्वल फळीतील फलंदाज केएल राहुलचाही संघात समावेश केला जाईल, परंतु तो फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतरच दुबईला रवाना होईल. विराट कोहलीही आशिया कपमध्ये खेळताना दिसणार आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर त्याला विश्रांती देण्यात आली आहे.

Team India
Asia Cup: सौरव गांगुलींची मोठी घोषणा, आशिया चषक यूएईमध्ये होणार

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, “निवडकर्ते व्हर्च्युअल मीटिंगद्वारे संघाची निवड करत आहेत. मात्र यावेळी ते भेटून आशिया कपसाठी भारतीय संघ निवडतील. या स्पर्धेपूर्वी केएल राहुल तंदुरुस्त होईल असा आम्हाला विश्वास आहे. संघाला सर्वोत्तम खेळाडूंची गरज आहे.''

Team India
Hockey Asia Cup 2022: भारताचा रोमहर्षक विजय, कांस्यपदकावर मानावे लागले समाधान

दुसरीकडे, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान आशिया चषक 2022 मधील पात्रता फेरीत भाग घेणार आहेत. आशिया कप 2022 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना रविवार 28 ऑगस्ट रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. तर दुसरा सामना 4 सप्टेंबरला होऊ शकतो. वास्तविक, ACC ने यावेळी वेळापत्रक काहीसे वेगळे केले आहे, जिथे 6 संघ दोन गटात ठेवण्यात आले आहेत. गट टप्प्यात सर्व संघांना त्यांच्या गटातील इतर दोन संघांशी सामना करावा लागतो. यानंतर, दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर 4 मध्ये जातील. अशा प्रकारे तिथे भारत विरुद्ध पाकिस्तान सामनाही शक्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com