Bhakti Kulkarni : अर्जुन पुरस्कार विजेती वूमन ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णीने चेक प्रजासत्ताकात झालेल्या पिल्सेन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात विजेतेपद मिळविले.
‘चेकटूर्स’वर खुल्या गटात विजेती ठरणारी ती पहिली महिला बुद्धिबळपटू ठरल्याची माहिची स्पर्धेचे संचालक मायकल होरॅसेक यांनी दिली.
भारताची बुद्धिबळ ऑलिंपियाड महिला सांघिक ब्राँझपदक विजेती भक्ती पिल्सेन स्पर्धेत अपराजित राहिली. नऊ फेऱ्यांच्या या स्पर्धेत सात विजय व दोन बरोबरीसह तिने आठ गुणांची कमाई केली. इतर प्रतिस्पर्ध्यांपेक्षा तिने दीड गुण जास्त नोंदविला.
आत्मविश्वास उंचावला : भक्ती
‘‘चेक प्रजासत्ताकातील या तुल्यबळ स्पर्धेतील विजेतेपदानंतर माझा आत्मविश्वास उंचावला आहे. माझे हे या वर्षीचे स्विस लीग पद्धतीच्या स्पर्धेतील पहिले प्रमुख जेतेपद आहे,’’ अशी प्रतिक्रिया भक्तीने दिली.
या वर्षी सप्टेंबरमध्ये चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळाचा समावेश आहे, त्या स्पर्धेनिमित्त भक्तीची भारतीय बुद्धिबळ स्पर्धेत प्राथमिक निवड झाली आहे.
19 देशांतील 91 खेळाडू
भक्तीसाठी पिल्सेन आंतरराष्ट्रीय स्पर्धा खडतर होती. या स्पर्धेत 19 देशांतील 91 खेळाडूंचा समावेश होता. भक्तीला (एलो 2303) स्पर्धेत द्वितीय मानांकन होते. जर्मनीचा इंटरनॅशनल मास्टर ओलाफ हेन्झेल याला उपविजेतेपद मिळाले. त्याने साडेसहा गुणांची नोंद केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.