Arjun Tendulkar : अर्जुन गोव्यातील क्रिकेटमध्ये रमला

जोरदार सराव : पर्वरी मैदानावर सलगपणे अथक मेहनतीवर भर
Arjun Tendulkar
Arjun TendulkarDainik Gomantak
Published on
Updated on

Arjun Tendulkar : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आता गोव्यातील क्रिकेटमध्ये चांगलाच रमला आहे. गेले काही दिवस दररोज पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर तो सलगपणे सराव करत असून अथक मेहनतीवर भर दिल्याचे दिसून येतेय.

जानेवारी 2021 मध्ये मुंबई क्रिकेट संघातर्फे सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत फक्त दोन सामने संधी मिळाल्यानंतर 22 वर्षीय अर्जुनला संघ निवडीत डावलण्यात आले. मैदानावर खेळण्यासाठी अधिक कालावधी हवाय या कारणास्तव त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून ना हरकत दाखला (एनओसी) मिळविला असून आगामी मोसमात हा डावखुरा वेगवान गोलंदाज गोव्यातर्फे खेळणार हे स्पष्ट झाले आहे. यावर्षीच्या आयपीएल स्पर्धेसाठी मुंबई इंडियनशी करराबद्ध होता, परंतु त्याला एकही सामना खेळायला मिळाला नव्हता.

Arjun Tendulkar
Goa Sports : साखळीच्या करणची विजयी झेप

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, गतआठवड्याच्या मध्यास अर्जुन गोव्यात दाखल झाला. त्यानंतर शुक्रवारपासून त्याने संभाव्य संघाच्या मोसमपूर्व शिबिरात सलगपणे सहभाग घेतला आहे. गोव्यातर्फे खेळताना सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरित असल्याचे अर्जुनच्या देहबोलीवर स्पष्ट होत आहे. ``अर्जुन आता गोव्याच्या संभाव्य संघासोबत दिल्लीस मोसमपूर्व शिबिरासाठी रवाना होईल. तेथे सराव करेल, नंतर तो पंजाबमधील जे. पी. अत्रेय करंडक स्पर्धेतही खेळेल. थोडक्यात आगामी मोसमात तो गोव्याचा प्रमुख वेगवान गोलंदाज असेल,`` असे जीसीए सूत्राने नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com