IPL 2023: अरिजीत, मंदाना, तमन्नाच्या परफॉर्मन्सने लावले ओपनिंग सेरेमनीला चार चांद, पाहा Video

शुक्रवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2023 स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यात स्टार सेलिब्रेटींच्या परफॉर्मन्सने चाहत्यांचे मने जिंकली.
IPL Opening Ceremony
IPL Opening CeremonyDainik Gomantak

IPL 2023 Opening Ceremony: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेला शुक्रवारपासून (31 मार्च) सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचा पहिला सामना गतविजेता गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळवला जात आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना सुरू आहे.

या सामन्यापूर्वी आयपीएलच्या 16 व्या हंगामाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या उद्घाटन सोहळ्याला काही लोकप्रिय सेलिब्रेटिंनी चार चांद लावले. या उद्घाटन सोहळ्याचे निवेदन मंदीरा बेदी यांनी केले. तसेच अरिजीत सिंग, तमन्ना भाटीया आणि रश्मिका मंदाना या सेलिब्रेटिंचे परफॉर्मन्स पाहायला मिळाले. त्यांच्या परफॉर्मन्सचे व्हिडिओ देखील आयपीएलच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करण्यात आले आहेत.

IPL Opening Ceremony
IPL 2023: रोहित का नव्हता 'कॅप्टन्स फोटो'मध्ये? कारण ऐकून मुंबई इंडियन्सच्या फॅन्सलाही येईल टेंशन

सर्वात पहिल्यांदा अरिजीत सिंगने परफॉर्म केले. त्याने 'ए वतन, मेरे वतन', लेहरा दो, केसरिया, देवा-देवा, चन्ना मेरे, कबीरा, अपना बना ले पिया, झुमे जो पठाण, शिवा, इंडिया जितेगा असे अनेक गाणी गायली. त्याच्या गाण्यावर एमएस धोनी आणि हार्दिक पंड्याही दाद देताना दिसले.

तसेच त्यानंतर रश्मिका आणि तमन्ना यांचे परफॉर्मन्स झाले. रश्मिकाने श्रीवल्ली, नाटू नाटू अशा गाण्यांवर परफॉर्म केले. तसेच तमन्नाने टम टम, ऊ अंटावां अशा गाण्यांवर परफॉर्मन्स दिला. त्याचबरोबर अखेरीस अरिजित, तमन्ना आणि रश्मिका तिघेही स्टेजवर आले होते.

त्याचबरोबर शेवटी बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह, आयपीएल अध्यक्ष अरुण धुमाल असे काही अधिकाही स्टेजवर आले. तसेच चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या स्टेजवर आले. यासह आयपीएल 2023 स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले.

IPL Opening Ceremony
IPL 2023: मुंबई-दिल्लीला मिळाले बुमराह-पंतसाठी बदली खेळाडू, 'हे' दोन क्रिकेटर्स घेणार जागा

यंदा 12 शहरात होणार सामने

यंदा आयपीएलमध्ये साखळी फेरी होम - अवे पद्धतीने पार पडणार आहे, म्हणजेच संघ घरच्या आणि प्रतिस्पर्ध्याच्या मैदानात सामने खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे यावेळी 12 शहरांमध्ये आयपीएलच्या साखळी फेरीतील सामने खेळवण्यात येणार आहेत.

चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, मुंबई, कोलकाता, लखनऊ, दिल्ली, अहमदाबाद, जयपूर, मोहाली, गुवाहाटी आणि धरमशाला या 12 शहरांमध्ये साखळी फेरीचे सामने खेळवले जाणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com