गोव्याच्या अर्चिताला वेटलिफ्टिंगमध्ये ऐतिहासिक पदक

राष्ट्रीय वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकणारी पहिली गोमंतकीय महिला
Archita Shirodkar
Archita ShirodkarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राष्ट्रीय वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकणारी पहिली गोमंतकीय महिला हा ऐतिहासिक मान गोव्याच्या अर्चिता शिरोडकर हिने शनिवारी मिळविला. तिेने ओडिशातील भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेतील युवा गटात ब्राँझपदकाची कमाई केली.

Archita Shirodkar
गोवा सरकारचा प्रतिनिधी असल्याचं भासवत लाखोंचा गंडा

अर्चिताने युवा महिला गटातील 64 किलो वजनगटात स्नॅचमध्ये 64 व क्लीन अँड जर्कमध्ये 84 असे एकूण 148 किलो वजन उचलले. पुदुचेरीच्या सी. हर्षिता हिने एकूण 165 किलो वजन उचलून सुवर्ण, तर उत्तर प्रदेशच्या सुषमा देवी हिने 154 किलो वजन उचलून रौप्यपदकाची कमाई केली.

Archita Shirodkar
'द काश्मीर फाईल्स'वरुन काँग्रेसचा प्रमोद सावंतांवर निशाणा

अर्चिताने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या अखिल भारतीय पातलीवरील बेंच प्रेस स्पर्धेत सबज्युनियर गटात दोन सुवर्णपदके जिंकली होती. पॉवरलिफ्टिंग व वेटलिफ्टिंगमध्ये अर्चिता गोव्याची (Goa) सर्वोत्तम खेळाडू असून दोन्ही प्रकारात तिने राज्यातील स्ट्राँगेस्ट वूमन हा किताब पटकाविला आहे. राष्ट्रीय वेटलिफ्टिंगमध्ये सोळा वर्षीय अर्चिता दुसऱ्यांदाच सहभागी झाली.

अर्चिताने राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant), गोवा वेटलिफ्टिंग असोसिएशनचे जयेश नाईक यांचे आभार मानले असून आई-वडीलांना राष्ट्रीय पदकाचे श्रेय दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

India vs Zimbabwe full squad and schedule
Rohit Sharma Retirement Rumours BCCI Interview
Argentina and Spain football players involved in an on-field altercation
FIFA World Cup 2026 Awards
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com