IPL 2026: "वैभव सूर्यवंशीच्या वादळासमोर प्रतिस्पर्धी ढेर, राजस्थान फायनलमध्ये जाणारच", दिग्गजाची मोठी भविष्यवाणी

Angelo Mathews IPL 2026 Final Prediction: बरसापारा स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध राजस्थान रॉयल्सने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर क्रिकेट विश्वात केवळ राजस्थानचीच चर्चा रंगली.
Angelo Mathews IPL 2026 Final Prediction
rajasthan royalsDainik Gomantak
Published on
Updated on

Angelo Mathews IPL 2026 Final Prediction: बरसापारा स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध राजस्थान रॉयल्सने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर क्रिकेट विश्वात केवळ राजस्थानचीच चर्चा रंगली. या विजयाचा प्रभाव इतका मोठा आहे की, श्रीलंकेचा माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने आयपीएल 2026 च्या फायनलबाबत आतापासूनच एक मोठी भविष्यवाणी केली.

मॅथ्यूजने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर राजस्थानच्या वर्चस्वाचे कौतुक करताना स्पष्टपणे म्हटले की, 'राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) संघ यावर्षी आयपीएल 2026 चा फायनल खेळणार!' मॅथ्यूजचे हे विधान राजस्थानच्या संघाची संतुलित फळी आणि त्यांचा सध्याचा फॉर्म किती घातक आहे, हे अधोरेखित करते.

Angelo Mathews IPL 2026 Final Prediction
IPL 2026 Points Table: मुंबई-चेन्नई तळाला! पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थानचा दबदबा, आरसीबी बॅकफूटवर; पंजाब किंग्सच्या गोटात आनंदाचं वातावरण

दरम्यान, या सामन्याचा खरा नायक ठरला तो म्हणजे केवळ 15 वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी. वैभवने आरसीबीच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करत क्रिकेट जगताला थक्क केले. त्याने अवघ्या 26 चेंडूंमध्ये 78 धावांची तुफानी खेळी खेळली. वैभवने आपल्या या झंझावाती खेळीत 7 गगनचुंबी षटकार लगावले, ज्यामुळे राजस्थानने 202 धावांचे मोठे लक्ष्य दोन षटके राखूनच गाठले. एका 15 वर्षांच्या मुलाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोलंदाजांसमोर ज्या निर्भयतेने फलंदाजी केली, ते पाहून स्टेडियममधील प्रेक्षकही अवाक झाले होते.

Angelo Mathews IPL 2026 Final Prediction
Fastest Delivery In IPL 2026: सुसाट अशोक शर्मा! 154.2 kmph च्या वेगाने टाकला IPL 2026 मधील सर्वात वेगवान चेंडू Watch Video

दुसरीकडे, पराभवाचा धक्का सहन करावा लागलेल्या आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार यानेही मोठे मन दाखवत राजस्थानच्या संघाचे आणि विशेषतः वैभव सूर्यवंशीचे कौतुक केले. सामन्यानंतरच्या मॅच प्रेझेंटेशनदरम्यान पाटीदारने आपल्या पराभवाचे मुख्य कारण सांगताना वैभवच्या खेळीचा उल्लेख केला. तो म्हणाला की, ज्या पद्धतीने राजस्थानच्या फलंदाजांनी आणि प्रामुख्याने वैभवने पॉवरप्लेमध्ये फटकेबाजी केली, तिथूनच सामन्याचे चित्र पालटले आणि दोन्ही संघांमधील अंतर वाढत गेले. 15 वर्षांच्या या मुलाने सुरुवातीच्या षटकांमध्येच आमच्याकडून सामना हिरावून घेतला होता, अशी कबुली पाटीदारने दिली.

Angelo Mathews IPL 2026 Final Prediction
IPL 2026: 10 संघ, 13 ठिकाणे, 70 साखळी सामने! आयपीएलचा धुमधडाका होणार सुरू; रॉयल चॅलेंजर्स, सनरायझर्स हैदराबाद भिडणार

राजस्थानने या विजयासह आपली विजयी घोडदौड कायम ठेवली असून वैभव सूर्यवंशीच्या रुपाने आयपीएलला एक नवा सुपरस्टार मिळाल्याची चर्चा आता सर्वत्र सुरु आहे. मॅथ्यूजसारख्या अनुभवी खेळाडूने केलेली भविष्यवाणी खरी ठरणार का, याकडे आता सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे. राजस्थानच्या या आक्रमक शैलीमुळे इतर संघांचे धाबे दणाणले असून आगामी सामन्यांमध्ये वैभवची बॅट असाच धमाका करणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com