Team India Coach: टीम इंडियाला मिळाला नवा कोच! 14 हजार धावा करणारा दिग्गज करणार महिला संघाला मार्गदर्शन

India Women's Cricket Team: बीसीसीआयने भारतीय महिला संघासाठी नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे.
India Women Cricket Team
India Women Cricket TeamDainik Gomantak
Published on
Updated on

India Women Cricket Team New Coach:

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी (25 ऑक्टोबर) भारतीय महिला संघासाठी नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे. सुलक्षणा नाईक, अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे यांचा समावेश असलेल्या बीसीसीआयच्या सल्लागार समितीने माजी क्रिकेटपटू अमोल मुजूमदारची या पदासाठी नियुक्ती केली आहे.

बीसीसीआयच्या सल्लागार समितीने शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर अमोल मुजूमदारची भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी निवड केली आहे.

अमोल मुजूमदारला खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर प्रशिक्षण क्षेत्रातही चांगला अनुभव आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई पुरुष संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले आहे. त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्येही प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.

त्याचबरोबर तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या सपोर्ट स्टाफचाही भाग होता. त्याचबरोबर 2019 साली दक्षिण आफ्रिकेने केलेल्या भारत दौऱ्यावेळी तो दक्षिण आफ्रिका पुरुष संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये होता.

India Women Cricket Team
World Cup 2023: 4,4,6,6,6 अन् मॅक्सवेलची 40 चेंडूत सेंच्युरी! अवघ्या 18 दिवसात मोडला जलद शतकाचा विश्वविक्रम

दरम्यान, भारतीय महिला संघाचे प्रशिक्षकपद रमेश पोवार यांनी सोडल्यानंतर डिसेंबर 2022 पासून रिक्त होते. त्यानंतर 2023 महिला टी20 वर्ल्डकप स्पर्धेवेळी, तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रभारी प्रशिक्षकपद हृषिकेश कानिटकरने सांभाळले होते. त्याचबरोबर यादरम्यान झालेल्या काही मालिकांमध्येही त्यांनी हे पद सांभाळले.

जुलैमध्ये बांगलादेश दौऱ्यात माजी गोलंदाज नौशिन अल खादीन यांनी हे पद सांभाळले. अखेर आता भारतीय महिला संघाला मुजूमदारच्या रुपात पूर्णवेळ प्रशिक्षक मिळाला आहे.

India Women Cricket Team
ODI World Cup: प्रेक्षकांची मजा होते पण खेळाडूंचे काय? मैदानावरील 'या' प्रकारामुळे Maxwell संतापला

या जबाबदारीबद्दल मुजूमदार म्हणाला, 'ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि मी प्रतिभाशाली खेळाडूंबरोबर काम करण्यासाठी आणि त्यांना योग्य तयारी आणि मार्गदर्शन देण्यास उत्सुक आहे. पुढील दोन वर्षे अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत, कारण दोन वर्ल्डकप स्पर्धा होणार आहेत. कोचिंग स्टाफबरोबर आम्ही प्रत्येक गोष्ट अचूक करण्याचा आणि यश मिळवण्याचा प्रयत्न करू.'

मुजूमदारने त्याच्या कारकिर्दीत 171 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात त्याने 30 शतकांसह 11167 धावा केल्या.तसेच त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 113 सामन्यात 3 शतकांसह 3286 धावा केल्या, तर त्याने 14 टी20 सामनेही खेळले, ज्यात त्याने 174 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com