इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला (IPL) 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, आयपीएलचा हा 17 वा हंगाम चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार एमएस धोनीचा अखेरचा हंगाम अशी चर्चा आहे.
यातच आता सीएसके आणि मुंबई इंडियन्सचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूने इच्छा व्यक्त केली आहे की भविष्यात रोहितने सीएसकेकडून खेळावे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की आयपीएल 2024 स्पर्धेत रोहित मुंबई इंडियन्सकडून केवळ खेळाडू म्हणून खेळणार आहे. या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागेवर हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद सोपवले आहे. यापूर्वी रोहितने 2013 ते 2023 दरम्याने मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना पाचवेळा संघाला आयपीएलचे विजेतेपद जिंकून दिले आहे.
दरम्यान, रोहित शर्माबद्दल बोलताना रायुडू न्यूज24 शी बोलताना म्हणाला की हार्दिकने एखादा हंगाम थांबल्यानंतर नेतृत्व कराया हवे होते. कारण गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांचा सेट-अप वेगवेगळा आहे.
हार्दिक पंड्या 2022 आणि 2023 हंगाम गुजरात टायटन्सकडून खेळला. त्याने या दोन्ही हंगामात गुजरातला त्याच्या नेतृत्वाखाली अंतिम सामन्यापर्यंत पोहचवले. तसेच 2022 मध्ये गुजरातने विजेतेपदही मिळवले होते. दरम्यान गेल्यावर्षाच्या अखेरीस गुजरातकडून ट्रेडिंग मार्फत मुंबईने हार्दिकला संघात घेतले होते. 2022 आधीही हार्दिक मुंबईकडून खेळत होता.
रायुडू म्हणाला, 'रोहित आणखी 5-6 वर्षे आयपीएल खेळू शकतो. जर त्याला नेतृत्व करायचे असेल, तर संपूर्ण जग त्याच्यासाठी खुले आहे. तो त्याला वाटेल तिथे सहज नेतृत्व करू शकतो.'
रायुडू पुढे म्हणाला, 'रोहितने 2025 मध्ये सीएसकेसाठी खेळावे अशी माझी इच्छा आहे, जर एमएस धोनी निवृत्त होणार असेल, तर रोहित सीएसकेचे नेतृत्वही करू शकतो.'
दरम्यान, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे सर्वात यशस्वी संघ आहेत. या दोन्ही संघांनी प्रत्येकी 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. मुंबईने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, तर चेन्नई सुपर किंग्सने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली ही सर्व विजेतीपदे जिंकली आहेत.
रोहितने आयपीएलमध्ये 243 सामने खेळले आहेत. यामध्ये 6211 धावा केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.