Finn Allen: फिन ऍलनची मोठी कामगिरी, वीरेंद्र सेहवाग-डेव्हिड वॉर्नरच्या खास क्लबमध्ये एन्ट्री!

Finn Allen: न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिल्या रोमांचक सामन्यात किवी संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
Finn Allen
Finn AllenDainik Gomantak

Finn Allen: न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिल्या रोमांचक सामन्यात किवी संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, किवी संघाचा दिग्गज फलंदाज फिन ऍलनने शानदार फलंदाजी करत टी-20 क्रिकेटच्या विशेष क्लबमध्ये आपले स्थान नोंदवले आहे.

पहिल्याच षटकात तीन षटकार मारले

दरम्यान, न्यूझीलंडकडून (New Zealand) सलामीला आलेल्या फिन ऍलनने पहिल्याच षटकात ल्यूक वुडच्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार ठोकले. त्याने तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर षटकार ठोकले.

अशाप्रकारे, तो टी-20 सामन्याच्या पहिल्याच षटकात तीन षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. त्याच्या आधी या क्लबमध्ये वीरेंद्र सेहवाग, डेव्हिड वॉर्नरसारखे दिग्गज खेळाडू आहेत.

Finn Allen
England vs New Zealand: कसोटी क्रिकेटमध्ये 'या' स्टार फलंदाजाने पहिल्यांदाच केला मोठा रेकॉर्ड, ऋषभ पंतही...

या फलंदाजांनी पहिल्याच षटकात तीन षटकार ठोकले आहेत

वीरेंद्र सेहवाग न्यूझीलंड विरुद्ध (2009)

डेव्हिड वॉर्नर वेस्ट इंडिज विरुद्ध (2010)

एविन लुईस विरुद्ध श्रीलंके (2021)

फिन ऍलन विरुद्ध इंग्लंड (2023)

Finn Allen
ENG vs IRE: स्टुअर्ट ब्रॉडने लॉर्ड्सवर रचला इतिहास, 10 वर्षांनंतर केला 'हा' पराक्रम

सेहवागने सुरुवात केली होती

आतापर्यंत या चार फलंदाजांनीच हा पराक्रम केला आहे. पण या धडाकेबाज फलंदाजीची सुरुवात वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) केली. 2009 मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर त्याने शानदार फलंदाजी केली होती, ज्यामध्ये त्याने टी-20 मालिकेत पहिल्याच षटकात तीन चेंडूवर तीन षटकार ठोकले होते.

पहिली टी-20 इंग्लंडने जिंकली

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पहिल्या T20 सामन्यात किवी संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडने 20 षटकांत 139 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाने 14 षटकांत 140 धावा करुन सामना सहज जिंकला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com