Virat Kohli on Hyderabad T20: टीम इंडियाने शुक्रवारी दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा गडी राखून विजय मिळवला. या विजयासह कर्णधार रोहित शर्माच्या शानदार खेळीमुळे भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आता तिसरा आणि निर्णायक टी-20 सामना रविवारी 25 सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये खेळवला जाईल. या सामन्यापूर्वी विराटने पाहुण्या संघाला खुले आव्हान दिले आहे.
रोहितची कमाल
नागपुरातील पावसामुळे मालिकेतील दुसरा टी-20 सामना 8-8 षटकांचा झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) आठ षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात 90 धावा केल्या. यानंतर भारतीय संघाने 7.2 षटकांत लक्ष्य गाठले. कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) तुफानी खेळी करत नाबाद 46 धावा केल्या. त्याने 20 चेंडूत चौकार आणि षटकार बरसात केली. फिरकीपटू अक्षर पटेलने दोन गडी बाद केले.
विराटने आव्हान दिले
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) दुसऱ्या T20 सामन्यात सहा चेंडू खेळून 11 धावा केल्या. टीम इंडियाच्या विजयानंतर विराट जल्लोष करताना दिसला. विराटने ट्विटरवर काही फोटो पोस्ट केले आहेत. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, 'आता हैदराबादमध्ये भेटू.'
विराटची बॅट अद्याप तळपली नाही
सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विराटचा जलवा अद्याप दिसला नाही. त्याने दोन सामन्यांत केवळ 13 धावा काढल्या. नागपूरमध्ये, जिथे त्याने 11 धावा केल्या, मोहालीमध्ये मालिकेतील पहिल्या T20 सामन्यात तो दोन धावा काढून नॅथन एलिसचा बळी ठरला. तर दुसरीकडे, विराटने आशिया कप-2022 च्या सुपर-4 सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद शतक झळकावले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.