All India Sub Junior Badminton स्पर्धेच्या आयोजनाबाबत ‘जीओए’ कडून कौतुक

All India Sub Junior Badminton: विक्रमी सहभाग असलेल्या या स्पर्धेचे भव्यदिव्य आयोजन केल्याबद्दल गोवा ऑलिंपिक संघटनेने (जीओए) शनिवारी आयोजकांचे कौतुक केले.
Goa Olympic Association
Goa Olympic AssociationDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अखिल भारतीय सबज्युनियर मानांकन बॅडमिंटन स्पर्धेच्या पात्रता फेरीस शनिवारी सकाळी सुरवात झाली, त्यावेळी १५ व १७ वर्षांखालील वयोगटातील मिळून एकूण ३६७८ विक्रमी प्रवेशिकांची नोंद झाली. अखिल भारतीय पातळीवरील स्पर्धेस इतका मोठा प्रतिसाद मिळण्याची पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, विक्रमी सहभाग असलेल्या या स्पर्धेचे भव्यदिव्य आयोजन केल्याबद्दल गोवा ऑलिंपिक संघटनेने (जीओए) शनिवारी आयोजकांचे कौतुक केले. गोवा बॅडमिंटन असोसिएशनतर्फे भारतीय बॅडमिंटन (Badminton) संघटनेच्या मान्यतेने आणि उत्तर गोवा जिल्हा बॅडमिंटन संघटना व गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने स्पर्धा घेण्यात येत आहे. पात्रता फेरीतील सामने शनिवारी अनुक्रमे नावेली येथील मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) इनडोअर स्टेडियम व फातोर्डा इनडोअर स्टेडियमवर सुरू झाले. नावेली हे स्पर्धेचे मुख्य केंद्र आहे. स्पर्धा आठवडाभर खेळली जाईल.

Goa Olympic Association
Junior Badminton Tournament: देविका सिहागला दुहेरी किताब जिंकण्याची संधी

‘जीओए’ शिष्टमंडळाची भेट

जीओए सचिव गुरुदत्त भक्ता यांनी शनिवारी स्पर्धेतील पात्रता फेरी लढतींना उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्यासमवेत बेनी व्हिएगस, फॅरेल फुर्तादो, सुदेश नागवेकर व इतरांची उपस्थिती होती. भक्ता यांनी सांगितले, की ‘‘गोवा (Goa) बॅडमिंटन असोसिएशनने केलेली सारी व्यवस्था कौतुकास पात्र आहे. सुमारे ३७०० नोंदणी, दोन स्पर्धा केंद्रे, १८ कोर्ट, प्रत्येक कोर्टवर प्रतिदिनी ६० सामने हे सारं थक्क करणारे आहे. प्रत्येक गोष्ट नियोजनबद्ध आहे,’’ असे मत भक्ता यांनी व्यक्त केले.

Goa Olympic Association
Online National Junior Chess: गोव्याचा नीतिश बक्षीसप्राप्त खेळाडूंत

गोव्याला पात्रता फेरीत संमिश्र यश

पात्रता फेरीत गोव्याच्या खेळाडूंना संमिश्र यश मिळाले. १५ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत ओवेस तहसिलदार याने के. महंमद अब्यान याच्यावर १५-१०, १५-१७ असा विजय नोंदविला. मात्र श्रीराम भांडणकर, स्पर्श कोलवाळकर, मोहित पेंडसे, अद्वैत बाळकृष्णन, वेद शेट्ये, राजस खांडेपारकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. १५ वर्षांखालील मुलींत मिनोष्का परेरा व लक्षिता सावळ यांनी विजयी सलामी दिली. मिनोष्काने आनिया सुरेश हिच्यावर १५-१२, १५-८ असा, तर लक्षिताने प्रियांशी सैनी हिच्यावर चुरशीच्या लढतीत १३-१५, १५-६, १५-३ असा विजय प्राप्त केला. यशिला रितिका चेल्लुरी, शगुन सिंग, सान्वी केळेकर, ख्रिसाने डिसा यांचे आव्हान पहिल्या फेरीत आटोपले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com