IND vs NZ: एजाज पटेलने भारतात रचला इतिहास मात्र...

एजाज पटेलने (Ajaz Patel) या दोघांचा विक्रम मोडला परंतु 36 वर्षीय रिचर्ड हेडलीचा विक्रम तो मोडू शकला नाही.
Ajaz Patel
Ajaz PatelDainik Gomantak
Published on
Updated on

एजाज पटेलसाठी (Ajaz Patel) भारताचा (India) दौरा स्वप्नपूर्तीपेक्षा काही कमी नव्हता. पहिल्या एका डावात 10 बळी घेणारा तो जगातील तिसरा गोलंदाज ठरला. परदेशी मैदानावर एका डावात 10 बळी घेणारा तो पहिला न्यूझिलंडचा (New Zealand) पहिला गोलंदाज ठरला. आता भारतीय भूमीवर सर्वाधिक विकेट्स घेऊन इतिहास रचला आहे. एजाज पटेलने मुंबई कसोटीत 225 धावांत 14 बळी घेतले. अशाप्रकारे तो भारतातील सर्वाधिक बळी घेणारा फिरकी गोलंदाज ठरला.

Ajaz Patel
एजाज पटेलने रचला इतिहास, टीम इंडिया बनली कठपुतळी

एजाज पटेलच्या आधी हा विक्रम स्टीव्ह ओ' कीफ (Steve O'Keefe) आणि जेसन क्रेजा (Jason Krejza) यांच्या नावावर होता. स्टीव्ह ओ' कीफने 2017 मध्ये पुण्यात खेळल्या गेलेल्या कसोटीत 12 विकेट घेतल्या होत्या. त्याच वेळी, 2008 मध्ये जेसन क्रेजाने नागपुरात खेळल्या गेलेल्या कसोटीत 12 विकेट घेतल्या होत्या. एजाज पटेलने या दोघांचा विक्रम मोडला परंतु 36 वर्षीय रिचर्ड हेडलीचा (Richard Headley) विक्रम तो मोडू शकला नाही. हेडलीने 1985 मध्ये ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात 15 विकेट घेतल्या होत्या. तर एजाजने 14 विकेट घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com