एजाज पटेल बनला ICC Player Of The Month; मयंक अग्रवालला हरवून जिंकला बहुमान

न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलला (Ajaz Patel) डिसेंबरसाठी ICC ICC Player Of The Month म्हणून निवडण्यात आले आहे.
Ajaz Patel
Ajaz Patel Twitter/ @ICC
Published on
Updated on

न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलला डिसेंबरसाठी ICC ICC Player Of The Month म्हणून निवडण्यात आले आहे. भारताचा मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क यांच्यासह त्याला नामांकन मिळाले होते. मात्र डावखुरा फिरकी गोलंदाज एजाज पटेलने यामध्ये बाजी मारली. त्याने मुंबईत खेळल्या गेलेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत एका डावात 10 विकेट्स घेण्याचा करिष्मा केला होता.

कसोटी क्रिकेटच्या एका डावात 10 बळी घेणारा तो तिसरा गोलंदाज आहे. त्याच्या आधी जिम लेकर (jim laker) आणि अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी ही कामगिरी केली होती. भारताविरुद्धच्या मुंबई कसोटीत एजाज पटेलने 14 विकेट घेतल्या होत्या. या सामन्यात न्यूझीलंडला (New Zealand) पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी एजाज पटेलची (Ajaz Patel) कामगिरी करिष्माई होती.

Ajaz Patel
IND vs SA: टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होऊ शकतात दोन मोठे बदल!

दरम्यान, एजाज पटेल हा भारतीय वंशाचा क्रिकेटपटू आहे. त्याचा जन्म मुंबईत (Mumbai) झाला असून त्याचे कुटुंबीय उदरनिर्वाहाच्या शोधात न्यूझीलंडला गेले. एजाज पटेल न्यूझीलंड कसोटी संघाचा सदस्य म्हणून पहिल्यांदाच भारतात आला तेव्हा त्याने आपल्या जन्मभूमीच्या शहरात चमत्कार केला. मयंक अग्रवाल आणि मिचेल स्टार्कची कामगिरी केवळ एजाज पटेलच्या एका डावात 10 विकेट्सच्या करिष्मामुळे मागे राहिली. मयंकने (Mayank Agarwal) मुंबई कसोटीत शतक झळकावत भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दुसरीकडे, मिचेल स्टार्कने अॅशेस मालिकेत अप्रतिम गोलंदाजी करताना महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा दावा केला.

एजाज 10 विकेट घेतल्यानंतर पुढील मालिकेतून गेला

एजाज पटेलने आतापर्यंत 11 कसोटी सामने खेळले असून 43 बळी घेतले आहेत. 2018 मध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) पदार्पण केले. भारताविरुद्ध एका डावात 10 बळी घेतल्यानंतर एजाज पटेलला न्यूझीलंडच्या पुढील कसोटी मालिकेतील संघात स्थान मिळू शकले नाही. किवी संघ सध्या घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध कसोटी खेळत आहे. परंतु एजाज या मालिकेत खेळत नाही. न्यूझीलंडमधील खेळपट्टी फिरकीला मदत करत नसल्याने त्याची निवड झाली नसल्याचे सांगितले जात आहे.

जेपी ड्युमिनीने एजाजचे कौतुक केले

आयसीसी व्होटिंग अकादमीचे सदस्य जेपी ड्युमिनी (Jp Duminy) यांनी एजाज पटेलच्या प्लेअर ऑफ द मंथच्या निवडीबद्दल म्हटले की, ही ऐतिहासिक कामगिरी आहे. एका डावात 10 विकेट्स घेण्याचा अद्भुत पराक्रम साजरा करायला हवा. एजाजची कामगिरी हा एक मैलाचा दगड आहे, जो येणाऱ्या अनेक वर्षांच्या स्मरणात राहील यात शंका नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com