ODI World Cup: नेदरलॅंड्सचा धुव्वा उडवत अफगाणिस्तान सेमीफायनलच्या दारात!

यंदाच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात अफगाणिस्तानने इंग्लंड आणि पाकिस्तानसारख्या दिग्गज संघांना पराभवाची धूळ चारत आपली जादू दाखवून दिली आहे. नेदरलॅंड्स विरुद्धच्या विजयामुळे अफगाण संघाच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत आहेत.
Afghanistan defeated netherlands in icc cricket world cup 2023.
Afghanistan defeated netherlands in icc cricket world cup 2023.Dainik Gomantak
Published on
Updated on

ICC ODI Cricket World Cup 2023, Netherlands vs Afghanistan:

भारतात सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात नवख्या अफगाणिस्तानने चमकदार कामगिरी केली आहे.

आधी विश्वविजेते इंग्लंड नंतर पाकिस्तान आणि आता नेदरलॅंड्सचा 7 विकेट्सने पराभव करत अफगाण संघाने स्पर्धेची उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवल्या आहेत.

शुक्रवारी (3 नोव्हेंबर) लखनऊच्या एकाना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने 3 फलंदाज राखून विजय मिळवला.

या सामन्यात नेदरलॅंड्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला. कारण फिरकीपटू मुजीब उर रेहमानने सलामीवीर वेस्ली बॅरेसी एका धावेवर खेळत असताना पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पायचीत पकडले.

त्यानंतर दुसरा सलामीवीर मॅक्स ओडोव्ह आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या एकरमनने संघाचा डाव सावरत उत्तम फलंदाजी केली.

नेदरलॅंड्सची धावसंख्या 73 असताना सलामीवीर मॅक्स ओडोव्ह 42 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर मोठी खेळी करेल असे वाटत असतानाच एकरमॅनही 29 धावांवर धावबाद झाला.

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या इग्लबर्टने फटाकेबाजी करत 58 धावांची खेळी. तो बाद झाल्यानंतर मात्र, नेदरलॅड्सकडून एकाही फलंदाजाला योगदान देता आले नाही.

ठराविक अंतराने नेदरलॅंड्सचे फलंदाज बाद होत गेल्याने त्यांचा डाव 46.3 षटकांत 179 धावांत आटोपला.

Afghanistan defeated netherlands in icc cricket world cup 2023.
ट्रेडिंग विंडोचा Mumbai Indians कडून श्रीगणेशा; लिलावाआधीच LSG चा ऑलराउंडर पलटनच्या ताफ्यात

सध्या जबरदस्त फॉर्मात असलेल्या अफगाणिस्तानची या 179 धावांचा पाठलाग करताना खराब सुरूवात झाली. त्यांचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात तंबूत परतले. रहमतुल्हा गुरबाझ 10 धावा करुन तर इब्राहीम झारदान 20 धावांवर बाद झाला.

मात्र, त्यानंतर रहमत शाहने फटाकेबाजी करत 52 धाव केल्या. कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीनेही दमदार अर्धशतक झळकावत त्याला साथ दिली. तर अमातुल्हा ओराझीने 31धाव केल्या.

Afghanistan defeated netherlands in icc cricket world cup 2023.
World Cup 2023: 'ICC, टीम इंडिया आणि वेगळा बॉल!' पाकिस्तानी क्रिकेटरचा हस्यास्पद दावा अन् आकाश चोप्राची फटाकेबाजी

संक्षिप्त धावफलक:

नेदरलॅंड्स: सेब्रॅंड एंजलब्रेक्ट- 58 धावा, मॅक्स ओडाऊन - 42 धावा; मोहम्मद नबी - 28 धावांत 3 विकेट्स

अफगाणिस्तान: हशमतुल्लाह शाहिदी - 56 धावा, रेहमत शाह - 52 धावा; लोगन वॅन बिक - 30 धावांत 1 विकेट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com