Viral Video: बाबो! एकाच षटकात 7 सिक्स अन् 48 धावा, 'या' फलंदाजानं केला ऋतुराजसारखाच पराक्रम

Video: अफगाणिस्तानच्या एका फलंदाजानं एकाच षटकात 7 षटकार ठोकण्याचा कारनामा केला आहे.
Sediqullah Atal
Sediqullah AtalDainik Gomantak
Published on
Updated on

Afghanistan Cricketer Sediqullah Atal hits 7 sixes: क्रिकेटमध्ये हा अनिश्चिततेचा खेळ आहे, असे म्हटले जाते. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. अशीच एक घटना काबुल प्रीमियर लीग स्पर्धेत पाहायला मिळाला आहे. या स्पर्धेत सेदिकुल्ला अटल याने एकाच षटकात 7 षटकारांसह मारले.

शनिवारी (29 जुलै) शाहिन हंटर्स आणि अबासिन डिफेंडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात ही घटना घटली. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या शाहिन हंटर्स संघाकडून कर्णधार सेदिकुल्ला अटलने 19 व्या षटकात अमीर झझाईच्या गोलंदाजीवर 7 षटकार मारले. यात नो-बॉलवरील षटकाराचाही समावेश आहे.

Sediqullah Atal
Ruturaj Gaikwad 7 Sixes: 'पाचव्या षटकारानंतर फक्त त्याच व्यक्तीचा विचार आला' ऋतुराजने मांडल्या भावना

या षटकातील पहिलाच चेंडू झझाईने नो-बॉल टाकला, ज्यावर सेदिकुल्लाने षटकार मारला. तसेच नंतर झझाईने टाकलेल्या वाईड चेंडूवर चौकार गेला. त्यामुळे पहिला अधिकृत चेंडू पडण्यापूर्वीच या षटकात 12 धावा निघाल्या. त्यानंतर झझाईने टाकलेल्या सर्व 6 चेंडूवर सेदिकुल्लाने षटकार ठोकले. त्यामुळे या षटकात तब्बल 48 धावा निघाल्या.

या षटकापूर्वी शाहिन हंटर्स संघ 6 बाद 158 धावांवर होते, तसेच सेदिकुल्ला 43 चेंडूंवर 71 धावांवर होता. पण नंतर 20 षटकांनंतर शाहिन हंटर्सने 6 बाद 213 धावा केल्या. सेदिकुल्ला 56 चेंडूत 118 धावावंर नाबाद राहिला. या खेळीत त्याने 10 षटकार मारले.

त्यानंतर अबासिन डिफेंडर्स संघाला 214 धावांचा पाठलाग करताना 18.3 षटकात सर्वबाद 121 धावाच करता आल्या. त्यामुळे शाहिन हंटर्सने हा सामना 92 धावांनी जिंकला.

Sediqullah Atal
6 Ball 6 Six Video: 6,6,6,6,6,6... रियाजला 32 वर्षीय फलंदाजानं धुतलं, नंतर गोलंदाजानं स्वत:चीच उडवली खिल्ली

ऋतुराजनेही मारलेले 7 षटकार

विजय हजारे ट्रॉफी 2022 या भारताच्या एकदिवसीय देशांतर्गत स्पर्धेत महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनेही एकाच षटकात सलग 7 षटकार मारण्याचा पराक्रम केला होता. त्याने उत्तर प्रदेशविरुद्ध उपांत्यपूर्व सामन्यात ही कामगिरी केली होती.

ऋतुराजने डावातील 49 व्या षटकात उत्तर प्रदेशचा गोलंदाज शिवा सिंग विरुद्ध पहिल्या चार चेंडूवर सलग 4 षटकार मारले होते. त्यानंतर नो-बॉलवरही त्याने षटकार खेचला होता. याशिवाय अखेरच्या दोन चेंडूंवरही त्याने षटकार मारले होते. यासह या षटकात एकूण 43 धावा निघाल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com