According to the latest reports, Shubman Gill has been admitted to a hospital in Chennai:
विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याला मुकल्यानंत, आता असे दिसते की शुभमन गिल बुधवारी होणाऱ्या अफगाणिस्तान आणि शनिवारी पाकिस्तानविरुद्धच्या मोठ्या लढतीलाही मुकण्याची शक्यता आहे.
सध्या डेंग्यूशी झुंजत असलेला गिलच्या पेशींमध्ये सातत्याने घट होत आहे. ताज्या अहवालानुसार गिलला चेन्नईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे आता महत्त्वाच्या सामन्यांसाठी टीम इंडियाची चिंता वाढली आहे.
सोमवारी, बीसीसीआयने प्रथमच गिलच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. त्यामध्ये सांगितले होते की, बुधवारी अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी गिल टीम इंडियासोबत दिल्लीला आलेला नाही.
आज काही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुभमन गिलच्या पेशी कमी झालेल्या असून, त्याला चेन्नईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि सध्या कावेरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
क्रिकबझने शुभमन गिलच्या संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केल्याने चाहत्यांची चिंता वाढली आहे. रिपोर्टनुसार, गिल सध्या रुग्णालयात दाखल आहेत. त्याच्या प्रकृतीवर बीसीसीआयचे तज्ज्ञ डॉक्टर लक्ष ठेवून आहेत.
डेंग्यूच्या आजारात ताप कमी होऊ शकतो आणि प्लेटलेटची संख्या सुधारू शकते, परंतु अशक्तपणा शरीरातून बाहेर पडण्यास वेळ लागतो. त्यामुळे गिलच्या प्रकृतीत सुधारणा होऊन डिस्चार्ज झाला तरीही तो पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी संघात सामील झाला तरी तो मॅच-फिट असेल की नाही हा एक वेगळा मुद्दा आहे.
गिल 12 किंवा 13 तारखेला अहमदाबादला पोहोचला तरी त्याला एकाही सराव सत्रात भाग घेता येणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.