Abhishek Porel Century: "माझ्या आयुष्यात खूप काही घडलं...", जेलमधून सुटल्यानंतर पठ्ठ्यानं लगावलं शतक; अभिषेक पोरेल ढसाढसा रडला

Abhishek Porel Ranji Trophy Century 2026: रणजी ट्रॉफी 2026-27 च्या हंगामातील पहिल्याच सामन्यात बंगालकडून खेळणाऱ्या युवा यष्टिरक्षक-फलंदाज अभिषेक पोरेलने चमकदार कामगिरी करत शानदार शतक झळकावले.
Abhishek Porel Ranji Trophy Century 2026
Abhishek Porel CenturyDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Abhishek Porel Statement On Century: रणजी ट्रॉफी 2026-27 च्या हंगामातील पहिल्याच सामन्यात बंगालकडून खेळणाऱ्या युवा यष्टिरक्षक-फलंदाज अभिषेक पोरेलने चमकदार कामगिरी करत शानदार शतक झळकावले. कल्याणी येथे दिल्लीविरुद्ध सुरु असलेल्या या सामन्यात अभिषेकने अत्यंत कठीण प्रसंगात जिद्द दाखवत दुसऱ्या दिवशीचा खेळ संपताना 114 धावांची नाबाद खेळी खेळली. शतक पूर्ण झाल्यानंतर अभिषेकच्या भावना अनावर झाल्या आणि मैदानावरच त्याला रडू कोसळले. गेल्या काही काळापासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यात आणि क्रिकेट कारकिर्दीत अनेक वाद व अडचणी आल्या, ज्याचा मानसिक ताण त्याच्यावर होता.

शतक झळकावल्यानंतर रेवस्पोर्ट्जशी संवाद साधताना अभिषेकने आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, गेल्या दोन वर्षांत त्याचे केवळ एकच शतक आले होते, त्यामुळे हे शतक त्याला मानसिक शांतता देणारे ठरले. जीवनातील चढ-उतार, दुखापत आणि इतर संकटांचा उल्लेख करत तो म्हणाला की, त्याला रडायचे नव्हते पण भावनांवर ताबा राहिला नाही. आपल्या सेलिब्रेशनबाबत बोलताना त्याने स्पष्ट केले की, तो शब्दांनी नाही तर आपल्या बॅटने उत्तर देऊ इच्छितो आणि क्रिकेट (Cricket) हेच त्याचे सर्वस्व आहे. कठीण प्रसंगात त्याला मौन बाळगून केवळ कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्याचे शिकवले असल्याचे अभिषेकने आवर्जुन सांगितले.

Abhishek Porel Ranji Trophy Century 2026
Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

अभिषेक पोरेलच्या वैयक्तिक आयुष्यातील विवादाबद्दल बोलायचे तर, कर्नाटकच्या एका मेडिकल विद्यार्थिनीने त्याच्यावर गंभीर आरोप केले. तिने दावा केला की, ते दोघे साडेतीन वर्षे एकत्र होते आणि लग्नाचे प्लॅनिंग सुरु होते, मात्र अभिषेकने लग्नास नकार दिला. या प्रकरणी त्याच्यावर दुष्कर्म आणि धमकी दिल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी जुलै 2026 मध्ये कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर त्याला काही काळ तुरुंगवासही झाला आणि सध्या तो जामिनावर बाहेर असून या प्रकरणाचा अंतिम निकाल अद्याप येणे बाकी आहे. कोर्टाची कायदेशीर प्रक्रिया सुरु असतानाही मैदानावरील त्याच्या या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com