Abdul Razzaq, India vs Pakistan: ज्या सामन्याकडे केवळ भारत आणि पाकिस्तानच नाही तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत, तो सामना उद्या म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी होणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप-2023 चा बहुप्रतिक्षित सामना शनिवार (2 सप्टेंबर) रोजी होणार आहे. हे दोन्ही संघ श्रीलंकेतील कॅंडी येथे आमनेसामने असतील.
या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू अब्दुल रज्जाकने कर्णधार बाबर आझमला खास आवाहन केले आहे.
आशिया चषकात पाकिस्तानने विजयाने सुरुवात केली आहे. मुलतान येथे खेळल्या गेलेल्या या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात नेपाळचा (Nepal) 238 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. आता त्याचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी भारतीय संघाशी होणार आहे.
दरम्यान, पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाकने म्हटले आहे की, आगामी आशिया चषक स्पर्धेतील गट-चरण सामन्यात पाकिस्तान संघ भारताकडून हरला तरी कर्णधार बाबर आझमने घाबरु नये. पराभवानंतरही बाबरने संघात बदल करण्याचा विचार करु नये, असे तो म्हणाले.
रज्जाक पुढे म्हणाला की, 'पाहा, पाकिस्तानची (Pakistan) सध्याची प्लेइंग-11 खूपच संतुलित आहे. तुमच्या मधल्या फळीत चांगले फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू आहेत. संघाच्या वेगवान आक्रमणात वेग आणि फिरकी आक्रमणाची पूर्ण ताकद आहे. तुमच्याकडे सर्व काही आहे. मला वाटते की तुमच्याकडे फक्त एकच संघ असावा, हे सर्वोत्तम कॉम्बिनेशन आहे.'
भारताविरुद्धच्या सामन्याबाबत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने मोठे वक्तव्य केले आहे. नेपाळविरुद्धच्या मोठ्या विजयानंतर तो म्हणाला की, 'भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी (नेपाळविरुद्धचा सामना) चांगली तयारी होती.
या विजयाने आम्हाला आत्मविश्वास दिला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने नेहमीच रोमांचक असतात. आम्हाला प्रत्येक सामन्यात 100 टक्के द्यायचे आहे.'
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.