AB de Villiers blamed T20 Cricket for not not having a third match between India and South Africa:
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा नुकताच संपला. कसोटी मालिकेने या दौऱ्याची सांगता झाली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा आणि अखेरचा सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियममध्ये झाला.
या सामन्यात भारताने दीडच दिवसात ७ विकेट्सने विजय मिळवला. 107 षटकातच हा सामना संपला. त्यामुळे हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात लहान सामना ठरला. तसेच सेंच्युरियनला झालेल्या पहिल्या कसोटीतही दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध तीन दिवसात डावाने विजय मिळवला होता. त्यामुळे कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली.
दरम्यान, आता या सामन्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिविलियर्सने भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात दोनच सामन्यांची कसोटी मालिका झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याने यासाठी वाढत्या टी20 लीगला जबाबदार धरले आहे.
डिविलियर्स त्याच्या युट्युब चॅनेलशी बोलताना म्हणाला, 'तिसरा कसोटी सामना नसल्याने मी निराश झालो. तुम्हाला त्यासाठी जगभर चालू असलेल्या टी20 क्रिकेटला दोष द्यावा लागले. मला माहित नाही की कोणाला दोष द्यायचा , पण मला काहीतरी चूकत असल्याचे जाणवत आहे.'
'जर तुम्हाला सर्व संघांना स्पर्धा करताना पाहायचे असेल आणि कोणता संघ सर्वोत्तम कसोटी संघ आहे, हे पाहायचे असेल, तर काहीतरी बदलायला लागेल.'
दरम्यान, दक्षिण आफ्रिका संघाला फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडचा दौरा करायचा असून या दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. पण या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघात 7 अशा खेळाडूंना निवडले आहे, ज्यांनी आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय पदार्पणच केले नाही, विशेष म्हणजे नी ब्रँड या खेळाडूला कर्णधार म्हणून निवडले आहे, ज्याचे अद्याप पदार्पण झालेले नाही.
जानेवारी-फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत SA20 लीग खेळवण्यात येणार आहे, या लीगमध्ये दक्षिण आफ्रिकेचे अनेक प्रमुख खेळाडू खेळणार आहेत. त्याचमुळे कसोटी मालिकेसाठी दुय्यम संघ दक्षिण आफ्रिकेने निवडला. याबद्दलही डिविलियर्सने आपले मत व्यक्त केले. तसेच त्याने असेही म्हटले की यात खेळाडूंची आणि प्रशिक्षकांची चूक नाही.
तो म्हणाला, 'न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाने सर्वांनाच धक्का दिला. तसेच त्यामुळे हे स्पष्ट झाले की कसोटी क्रिकेट दबावात आहे आणि वनडे क्रिकेट देखील. संपूर्ण प्रणाली टी20 क्रिकेटभोवती फिरायला लागली आहे.'
'खेळाडू, बोर्ड आणि प्रशिक्षक जिथे जास्त पैसा आहे, तिथेच जाणार आहे. त्यांनी त्यांच्या भविष्याबद्दल आणि कुटुंबाबद्दल विचार करण्यासाठी त्यांना तुम्ही दोष देऊ शकत नाही.'
SA20 लीग 10 जानेवारी ते 10 फेब्रुवारीदरम्यान खेळवली जाणार आहे. तसेच दक्षिण आफ्रिका न्यूझीलंड दौऱ्यात पहिला कसोटी सामना 4 ते 8 फेब्रुवारीदरम्यान खेळणार आहे, तर दुसरा सामना 13 ते 17 फेब्रुवारीदरम्यान खेळवला जाणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.