आम आदमी पार्टी डॉ. संदीप पाठक, क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि दिल्लीचे आमदार राघव चढ्ढा यांना पंजाबमधून राज्यसभेवर पाठवणार आहे. संदीप पाठक यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास पंजाबमध्ये (Punjab) पक्षाच्या विजयात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. सलग तीन वर्षे पंजाबमध्ये राहून त्यांनी बूथ स्तरापर्यंत पक्षाचं संघटन उभारलं. ते आयआयटीमध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत. विशेष म्हणजे ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंजाबचे नवनियुक्त मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांचे निकटवर्तीय मानले जातात. 'आप' नेही क्रिकेटपटू हरभजन सिंगला राज्यसभेवर पाठवण्याचा मूड बनवला आहे. (Aam Aadmi Party send Sandeep Pathak Harbhajan Singh Raghav Chadha Rajya Sabha from Punjab)
त्याच वेळी, पंजाबच्या राज्यसभेच्या 5 जागांसाठी आज शेवटचा दिवस आहे. पंजाबमध्ये 31 मार्च रोजी राज्यसभेसाठी निवडणूक होणार असून 5 खासदारांचा कार्यकाळ 9 एप्रिल रोजी संपत आहे. पंजाबमधून अशोक मित्तलही राज्यसभेवर जाऊ शकतात, अशीही बातमी समोर येत आहे.
तसेच, आम आदमी पार्टीने (Aam Aadmi Party) त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. ते लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक आहेत. मित्तल हे शिक्षण आणि समाजसेवा क्षेत्रातील कार्यासाठी ओळखले जातात. या वर्षी झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत AAP ने 117 पैकी 92 जागा जिंकल्या होत्या. अशा स्थितीत राज्यसभेच्या रिक्त जागांवरही एकाच पक्षाच्या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.