'…तर जो रुट टीम इंडियाचा कर्णधार झाला असता'

यूट्यूब चॅनलवर एका चाहत्याला उत्तर देताना आकाश चोप्रा म्हणाला की, 'भारतीय संघ (Team India) टी-20 मध्ये यशस्वी होण्यासाठी इंग्लंडकडून खूप काही शिकू शकतो.'
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

टी-20 विश्वचषक 2021 (T20 World Cup 2021) मध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या टीम इंडियाला (Team India) इंग्लंडकडून (England) शिकण्याचा सल्ला देण्यात आला आहे. माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने (Aakash Chopra) हा सल्ला दिला आहे, त्यानुसार टीम इंडियाने इंग्लंडमधून शिक्षण घ्यावे. त्याच्या यूट्यूब चॅनलवर एका चाहत्याला उत्तर देताना आकाश चोप्रा म्हणाला की, 'भारतीय संघ टी-20 मध्ये यशस्वी होण्यासाठी इंग्लंडकडून खूप काही शिकू शकतो.'

आकाश चोप्रा म्हणाला, 'इंग्लंडची रणणिती स्पष्ट असून ते एकाच दिशेने पुढे जातात. त्याने काउंटी, नॅटवेस्ट टी-20, द हंड्रेडमधून सर्वोत्कृष्ट टी-20 क्रिकेटपटूंची निवड केली असून फॉरमॅटच्या मागणीनुसार ते खेळाडूंची निवड करतात. आकाश चोप्राने इशाऱ्यामधून टीम इंडियाच्या सेलेक्शन पॉलिसीची खिल्ली उडवली. तो पुढे म्हणाला की, जो रुट भारतीय असता तर तो नक्कीच भारतीय टी-20 संघाचा कर्णधार असता.

Team India
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्न पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

…तर जो रुट भारतीय कर्णधार झाला असता

आकाश चोप्रा पुढे म्हणाला, 'इंग्लंडचा संघ कसोटी फॉरमॅटमधील कामगिरी पाहून खेळाडूंची निवड करत नाही. जो रुटचेच उदाहरण घ्या. जर तो भारतीय असता तर तो निश्चितपणे टीम इंडियाच्या T20 संघाचा भाग असता, जरी त्याचा स्ट्राइक रेट 125 च्या आसपास असला तरीही. तो T20 संघाचा कर्णधार असता. हे सर्व भारतात घडते, तर इंग्लंडची रणनिती पूर्णपणे याच्या विरुद्ध आहे.'' आकाश चोप्रा पुढे म्हणाला, ''इंग्लंडचे धोरण स्पष्ट आहे. डेव्हिड मलान हा T20 संघाचा भाग असून तो जास्त कसोटी सामने खेळत नाही. मोईन अली आणि आदिल रशीद यांनाही त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे ही सांगण्यात आले आहे. त्यांचा प्राधान्यक्रम स्पष्ट आहे. भारताने यातून धडा घेण्याची गरज आहे. तुम्ही फक्त एका खेळाडूला धरुन तुमच्या संघाची रणनीती बनवू शकत नाही. तुमच्या संघामागे एक दृष्टी असायला हवी. भारतीय उपखंडात खेळाडूला प्राधान्य दिले जाते आणि त्यातूनच बाहेर पडण्याची गरज आहे.

दरम्यान, प्रश्न असा आहे की आकाश चोप्रा कोणत्या भारतीय खेळाडूला लक्ष्य करत आहे? केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत या भारतीय फलंदाजांबद्दल बोलायचे तर हे सर्व खेळाडू तिन्ही फॉरमॅटमध्ये आपले उत्तम प्रदर्शन करतात. टी-20मध्ये सूर्यकुमार यादव, इशान किशनसारखे टी-20 स्पेशालिस्ट खेळाडू आहेत. भारतीय संघात तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळू शकणारे अनेक खेळाडू आहेत. इंग्लंडचा संघ या बाबतीत फारसा भाग्यवान दिसत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
India Wins By 124 Runs in Asian Games
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com