पाकिस्ताननं 'B' टीमला हरवलं, पण जल्लोष वर्ल्ड कप जिंकल्यासारखा! शाहबाज शरीफ यांच्या 'प्राइड'वर आकाश चोप्राचा 'मास्टर स्ट्रोक'

Aakash Chopra vs Shehbaz Sharif: तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा 22 धावांनी पराभव केला आणि संपूर्ण पाकिस्तानात जणू काही विश्वचषकच जिंकल्यासारखा जल्लोष सुरु झाला.
Aakash Chopra vs Shehbaz Sharif
Aakash Chopra vs Shehbaz SharifDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan vs Australia: ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात पाकिस्तानने मिळवलेल्या विजयाचे पडसाद सध्या मैदानाबाहेर मोठ्या प्रमाणावर उमटत आहेत. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा 22 धावांनी पराभव केला आणि संपूर्ण पाकिस्तानात जणू काही विश्वचषकच जिंकल्यासारखा जल्लोष सुरु झाला.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी तर या विजयाचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे दाखवत सोशल मीडियावर चक्क पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसिन नक्वी आणि संपूर्ण संघाचे गुणगान गायले. त्यांनी हा विजय देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले, मात्र पाकिस्तानचा (Pakistan) हा आनंद फार काळ टिकला नाही. भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध हिंदी समालोचक आकाश चोप्राने शाहबाज शरीफ यांच्या या पोस्टवर अशी काही टिप्पणी केली की, ज्यामुळे पाकिस्तानच्या या अतिउत्साहाची सर्वत्र चर्चा सुरु झाली.

Aakash Chopra vs Shehbaz Sharif
India vs Australia: मुसळधार पाऊस, विजेचा कडकडाट... वीज पडून एका खेळाडूचा मृत्यू, 'या' कारणामुळं भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया सामना रद्द

आकाश चोप्राने शाहबाज शरीफ यांना वास्तवाची जाणीव करुन देताना म्हटले की, हा विजय नेमका कोणाविरुद्ध मिळाला आहे हे आधी तपासावे. त्याने स्पष्ट केले की, पाकिस्तान ज्या ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव करुन आनंद साजरा करत आहे, तो प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाचा 'ब' (B Team) संघ आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचे अनेक मुख्य आणि दिग्गज खेळाडू खेळत नाहीत.

Aakash Chopra vs Shehbaz Sharif
India vs Australia: चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी टीम इंडियाला बसला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू अचानक मायदेशी, काय कारण?

तसेच, 170 धावांच्या आव्हानासमोर 22 धावांनी मिळवलेला विजय हा काही 'अत्यंत भव्य' किंवा 'धक्कादायक' विजय म्हणता येणार नाही. चोप्राच्या या मार्मिक टिप्पणीने शाहबाज शरीफ यांनी केलेल्या दाव्यातील हवाच काढून टाकली. हा एक द्विपक्षीय सामना होता आणि त्याला विश्वचषक विजयाचे स्वरुप देणे हास्यास्पद असल्याचे मत क्रिकेट चाहत्यांमध्ये आता उमटत आहे.

या विजयाचे महत्त्व पाकिस्तानसाठी इतके मोठे असण्याचे कारण म्हणजे, तब्बल 2650 दिवसांनंतर पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात विजय मिळाला आहे. या आकडेवारीवरुनच हे स्पष्ट होते की, जागतिक क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासमोर पाकिस्तानचा निभाव लागणे किती कठीण असते.

Aakash Chopra vs Shehbaz Sharif
India vs Australia T20I Series: सूर्या ब्रिगेडला मोठा झटका! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन सामन्यांतून स्टार अष्टपैलू बाहेर; बीसीसीआयने दिली महत्त्वाची अपडेट

आगामी टी-20 विश्वचषक 2026 च्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला हा विजय आत्मविश्वास वाढवणारा वाटू शकतो, पण आकाश चोप्राने दाखवलेला आरसा हा महत्त्वाचा आहे. जेव्हा मुख्य ऑस्ट्रेलिया संघ समोर असेल, तेव्हाच पाकिस्तानच्या खऱ्या क्षमतेची कसोटी लागेल, असा टोला भारतीय चाहत्यांकडून लगावला जात आहे. सध्या आकाश चोप्राची ही सोशल मीडिया पोस्ट तुफान वायरल होत असून शाहबाज शरीफ यांच्या 'अतिउत्साही' वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com