Viral Video: केएल राहुल कोणाला म्हणाला 'पास मत आना,' पाहा मुंबई विमानतळावरील व्हिडिओ

KL Rahul: सध्या दुखापतीतून सावरत असलेला भारताचा मधल्या फळीचा फलंदाज केए राहुल 15 फेब्रुवारीपासून राजकोट येथे इंग्लंडविरुद्ध होणारी तिसरी कसोटी खेळण्याच्या मार्गावर आहे.
KL Rahul
KL RahulDainik Gomantak
Published on
Updated on

A video of KL Rahul at Mumbai airport is going viral on social media. In which KL Rahul was saying to the paparazzi, 'Pas mat ana':

सध्या दुखापतीतून सावरत असलेला भारताचा मधल्या फळीचा फलंदाज केए राहुल 15 फेब्रुवारीपासून राजकोट येथे इंग्लंडविरुद्ध होणारी तिसरी कसोटी खेळण्याच्या मार्गावर आहे.

नुकतेच राहुलचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये केएल राहुल पापाराझींना, 'पास मत आना' असे म्हणत होता.

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत राहुलने पहिल्या डावात महत्त्वपूर्ण 86 धावा केल्या, परंतु तो सामना भारताने 28 धावांनी गमावला. पाठीच्या दुखण्यामुळे तो विशाखापट्टणममधील दुसरी कसोटी खेळू शकला नाही, परंतु यजमानांना राहुलची अनुपस्थिती जाणवली नाही कारण भारतानी चौथ्या दिवशीच हा सामना 106 धावांनी जिंकला.

KL Rahul
Indian Hockey Player Varun Kumar: बलात्काराचा आरोप असणाऱ्या वरुणची 'या' लीगमधून माघार; टीम इंडियाला मोठा धक्का

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन येथील पहिल्या कसोटीत 100 धावा करून यष्टीरक्षक-फलंदाजने मधल्या फळीतील आपले स्थान पक्के केले होते. परंतु त्या सामन्याततही भारताला पराभूत व्हावे लागले होते. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आणखी एका शतकाची राहुलला संधी होती, पण तो ८६ धावांवर बाद झाला.

KL Rahul
AUS vs PAK, U19 World Cup: वर्ल्ड कप फायनलमध्ये इंडिया-ऑस्ट्रेलिया भिडणार; चांगले खेळूनही पाकिस्तानच्या पदरी निराशा!

पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवानंतर, दुसऱ्या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करत पहिल्या डावात 396 धावा केल्या. नंतर जसप्रीत बुमराहने 6 विकेट्स घेऊन इंग्लंडला 253 धावांत गुंडाळले आणि भारताला 143 धावांची आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या डावात शुभमन गिलने 100 धावांची खेळी करत पाहुण्या संघाला 399 धावांचे लक्ष्य दिले. इंग्लंडने विजयासाठी जोरदार प्रयत्न केले, परंतु विजय मिळवण्यात ते अपयशी ठरले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com