फातोर्डा : हल्लीच नावेली येथील मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) इनडोअर स्टेडियममध्ये (Indoor Stadium) गोवा सुपर बॉडीज पावरलिफ्टिंग असोसिएशनने आयोजित केलेल्या 30व्या राष्ट्रीय बेंचप्रेस स्पर्धेत गोव्याची उल्लेखनीय कामगिरी झाली. या स्पर्धेत गोवा संघातर्फे 85 खेळा़डुंनी भाग घेतला व 5 सुवर्ण, 2 रौप्य व 7 कांस्य पदकांसह एकुण 14 पदकें जिंकली.
या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरुन सर्वोत्तम व विक्रमी प्रतिसाद लाभाला. 29 राज्यांतील 1700 पेक्षा जास्त खेळाडुंनी भाग घेतला. ही स्पर्धा एक्विप्ड, क्लासिक, पुरुष व महिला ज्युनियर, सब-ज्युनियर, मास्टर्स या गटांमध्ये घेण्यात आली.
गोवा तर्फे अर्चिता शिरोडकरने सब-ज्युनियर गटात दोन सुवर्ण पदकें जिंकली. मनिषा गिरबने मास्टर एक गटात दोन सुवर्ण पदकें जिंकली. रेजिना दोरादोने मास्टर दोन गटात 1 सुवर्ण व 1 रौप्य पदक जिंकली. इतर पदक विजेते पुढीलप्रमाणे - अनुष्का शिरोडकर - 1 रौप्य (सब-ज्युनियर), मेलिसन रिव्स - 1 कांस्य (सब-ज्युनियर 120 प्लस गट), के प्रसाद नाईक - 1 कांस्य (सिनियर 120 प्लस),
ब्रॅंडन बार्रेटो - 1 कांस्य (सिनियर गट), शुभम गावस, रझशाद शेख, धनंजय नाईक, सर्वेश कवठणकर (कांस्य पदके).
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दामोदर (दामू) नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती आयोजित करण्यात आली होती. यात सत्येन आर्सेकर (चेअरमन), प्रिंस परेरा (अध्यक्ष) व के प्रसाद नाईक (सरचिटणीस) यांचा समावेश होता.
पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेचा समारोप सोहळा 20 रोजी संपन्न झाला. गोव्याची वीज मंत्री (Minister of Power) निलेश काब्राल (Nilesh Cabral) प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. संकेत आर्सेकर, सावियो आलेमाव, सत्यवान नाईक हे सन्माननिय अतिथी म्हणुन उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.