IND vs AUS: पॅलेस्टाईनचा झेंडा घेऊन विराटला भेटण्यासाठी प्रेक्षकानं भेदलं मैदानाचं सुरक्षा कवच, फोटो व्हायरल

World Cup 2023: वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या फायनलदरम्यान अहमदाबादमध्ये सुरक्षा कवच भेदून एक प्रेक्षक विराटला भेटण्यासाठी मैदानात घुसला होता.
A pitch invader meet Virat Kohli in Ahmedabad
A pitch invader meet Virat Kohli in AhmedabadX

A pitch invader meet Virat Kohli in Ahmedabad:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात अंतिम सामना होत आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.

दरम्यान, या सामन्यात एक वक्ती अचानक मैदानात घुसला होता. भारतीय संघाने सुरुवातीलाच 3 विकेट्स गमावल्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल डाव सांभाळत असताना १४ व्या षटकात ही घटना घडली.

A pitch invader meet Virat Kohli in Ahmedabad
World Cup 2023: फायनलपूर्वी मास्टर-ब्लास्टरने शेवटच्या वनडेची खास आठवण किंग कोहलीला दिली गिफ्ट! पाहा फोटो

त्यावेळी एका व्यक्तीने मैदानाचे सुरक्षा कवच तोडण्याच यश मिळवले आणि तो मैदानात घुसला. त्यानंतर तो विराटला जाऊन भेटला. पण विराटने लगेचच त्याच्यापासून दूर झाला.

त्यानंतर लगेचच सुरक्षा रक्षकांनी त्याला मैदानातून बाहेर काढले. त्या व्यक्तीच्या टी-शर्टवर 'स्टॉप बॉम्बिंग पॅलेस्टाईन' असे लिहिले होते. तसेच त्याच्याकडे पॅलेस्टाईनचा झेंडाही होता. त्यामुळे त्याची सध्या चर्चा होत आहे.

त्या व्यक्तीला बाहेर केल्यानंतर लगेचच सामना पुढे चालू झाला. दरम्यान, या सामन्यात भारताने पाचव्याच षटकात शुभमन गिलची विकेट 4 धावांवर गमावली होती. पण त्यानंतर विराट कोहलीने कर्णधार रोहित शर्माला चांगली साथ दिलेली. त्यांच्यात अर्धशतकी भागीदारीही झाली.

मात्र 10 व्या षटकात रोहितला 47 धावांवर ग्लेन मॅक्सवेलने ट्रेविस हेडच्या हातून झेलबाद केले. तसेच श्रेयस अय्यरही 4 धावांवर बाद झाला. तर विराट कोहली अर्धशतकी खेळी करून 53 धावांवर बाद झाला.

A pitch invader meet Virat Kohli in Ahmedabad
World Cup 2023: चौथ्यांदा फायनल खेळणार भारतीय संघ! पाहा यंदा कोणाविरुद्ध मिळवले विजय अन् सामन्याचे हिरो

विराट कोहलीच्या सर्वाधिक धावा

दरम्यान, विराटने अर्धशतक केल्याने आता त्याने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. त्याने 11 सामन्यांत 95.62 च्या सरासरीने 765 धावा केल्या. यात त्याच्या 3 शतकांचा आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे.

अंतिम सामन्यासाठी अशी आहे प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

  • ऑस्ट्रेलिया - ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), ऍडम झम्पा, जोश हेझलवुड

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com