नेपाळ क्रिकेटमध्ये भूकंप, खेळाडू अन् क्रिकेट बोर्ड आमने-सामने !

नेपाळ क्रिकेटमध्ये (Nepal Cricket Team) वादंगाची मोठी ठिणगी पडल्यामुळे खेळाडू चांगलेच संतापले आहेत. हा वाद खेळाडू आणि नेपाळ क्रिकेट असोसिएशनमध्ये असून जो ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे.
Nepal Cricket Team 

Nepal Cricket Team 

Twitter/ @paras77

Published on
Updated on

नेपाळ क्रिकेट संघ (Nepal Cricket Team) गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. कालांतराने ही टीम आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा करताना दिसत आहे. या संघातील खेळाडू असलेल्या संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) कोणत्या प्रकारची स्पर्धा सुरु आहे यासंबधी सांगितले आहे. तो सध्या जगभरातील T20 लीगमध्ये भाग घेत आहे. मात्र दुसरीकडे नेपाळ क्रिकेटमध्ये सर्व काही अलबेल आहे असं काही दिसत नाही. नेपाळ क्रिकेटमध्ये वादंगाची मोठी ठिणगी पडल्यामुळे खेळाडू चांगलेच संतापले आहेत. हा वाद खेळाडू आणि नेपाळ क्रिकेट असोसिएशनमध्ये असून जो ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे. मात्र आता या वादाने नवे वळण घेतले आहे. याचा परिणाम असा झाला आहे की, बोर्डाने कर्णधार पदावरुन ज्ञानेंद्र मल्लाला (Narendra Malala) हटवले आहे. अन् त्याच्या जागी 21 वर्षीय संदीपची नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. या वादानंतर नेपाळमधील क्रिकेट चाहते खेळाडूंच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.

दरम्यान, एवढ्यावरच न थांबता उपकर्णधार दीपेंद्र सिंग ऐरी यांनाही बोर्डाने पदावरुन हटवले आहे. वरिष्ठ खेळाडू सोमपाल कामी आणि युवा वेगवान गोलंदाज कमल सिंग ऐरी या खेळाडूंच्या करारात समाविष्ट असलेल्या अटींवरुन मल्ला आणि दीपेंद्र यांचा बोर्डाशी वाद झाला होता. नेपाळ क्रिकेट असोसिएशनने ज्या प्रकारे ग्रेड कॉन्ट्रॅक्ट दिले आहे, त्याला अनेक वरिष्ठ खेळाडूंनी विरोध केला आहे. यासोबतच मॅच फी आणि बक्षीस रकमेच्या तरतुदींमध्ये केलेल्या बदलांनाही खेळाडूंनी विरोध दर्शवला आहे. त्यानंतर बोर्डाने हा निर्णय घेतला होता. 2022 च्या पहिल्या सहा महिन्यांच्या करारात या चौघांचा समावेश न करण्याचा निर्णय बोर्डाने जाहीर केला होता. या चार खेळाडूंनी एक निवेदनही जारी केले आहे, जे नेपाळी भाषेत आहे.

<div class="paragraphs"><p>Nepal Cricket Team&nbsp;</p></div>
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाचा ‘चक दे इंडिया’ वाला अंदाज

बोर्डाने सांगितले

नेपाळने क्रिकेट बोर्डाने बुधवारी एक निवेदन जारी करत कर्णधार आणि उपकर्णधाराला हटवल्याचे जाहीर केले. खेळाडूंकडून उत्तरे मागण्यात आली मात्र खेळाडूंचा प्रतिसाद समाधानकारक न आल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बोर्डाने जाहीर केले.

त्याचवेळी बोर्डाच्या अध्यक्षांनी खेळाडूंमध्ये शिस्तीचा अभाव असल्याचे देखील म्हटले आहे. बोर्डाचे अध्यक्ष चतुर बहादूर चंद (Chatur Bahadur Chand) यांनी काही दिवसांपूर्वी अंडर-19 राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत राष्ट्रीय संघातील सध्याच्या खेळाडूंवर टीका करत त्यांच्यात शिस्तीचा अभाव असल्याचे म्हटले होते.

असा सल्ला क्रीडामंत्र्यांनी बोर्डाला दिला

त्याचवेळी, नेपाळचे क्रीडा मंत्री महेश्वर जंग घाटराज (Maheshwar Jung Ghatraj) यांनी बोर्डाला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. कारण त्यांनी खेळाडूंच्या विरोधात घेतलेले निर्णय बोर्ड आणि खेळाडूंच्या बाबतीत नकारात्मकतेचे दर्शन घडवत आहेत. लवकरच हे प्रकरण शांततेत मार्गी लागेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

<div class="paragraphs"><p>Nepal Cricket Team&nbsp;</p></div>
IND VS SA: विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेचा बदला घेणार? की ...

त्याचवेळी नेपाळचा क्रिकेटर पारस खडका यांनी ट्विट करुन आपल्या खेळाडूंना पाठिंबा आहे. त्याने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “आम्ही आमच्या खेळाडूंच्या समर्थनात आहोत. न्याय मिळाला पाहिजे. आशा आहे की, बोर्ड आपला निर्णय मागे घेईल आणि खेळाडू त्यांचे प्रशिक्षण सुरु करु शकतील. त्याचबरोबर T20 विश्वचषक पात्रता फेरीवर लक्ष केंद्रित करतील. ”

लामिछा करणार सुरुवात

T20 विश्वचषक ग्लोबल क्वालिफायर्समध्ये लामिछाने पहिल्यांदाच आपल्या राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करणार आहे. ही स्पर्धा फेब्रुवारीमध्ये ओमानमध्ये खेळवली जाणार आहे. लामिछाने याआधी नेपाळच्या अंडर-19 संघाचे नेतृत्व केले आहे. 2016 च्या आशिया कपमध्ये त्याने संघाचे नेतृत्व केले होते. यानंतर, 2017 मध्ये आशियाई क्रिकेट परिषदेच्या विश्वचषक पात्रता स्पर्धेतही त्याने संघाचे नेतृत्व केले. त्याने अलीकडेच एव्हरेस्ट प्रीमियर लीगमध्ये काठमांडू किंग्ज इलेव्हनचे नेतृत्व केले. ही नेपाळची देशांतर्गत फ्रँचायझी T20 स्पर्धा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com