IND vs PAK: भारत-पाक सामन्यात या खेळाडूंवर सर्वांच्या नजरा, पाहा यादीत कोणाचा समावेश

आशिया कप 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तानचा संघ 28 ऑगस्टला आमनेसामने येणार आहे.
IND vs PAK
IND vs PAKDainik Gomantak
Published on
Updated on

आशिया चषक 2022 सुरू होण्यासाठी सुमारे 7 दिवस बाकी आहेत. आशिया कप 2022ची सुरुवात 27 ऑगस्टपासून होणार आहे. भारत आणि पाकिस्तान 28 ऑगस्टला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत.भारताचा महान क्रिकेटपटू विराट कोहली खराब फॉर्मशी झगडत आहे.पण या स्पर्धेद्वारे किंग कोहलीला फॉर्ममध्ये परत यायला आवडेल. अशा खेळाडूंवर एक नजर टाकूया ज्यांच्याकडे संघाचे सामने एकहाती जिंकण्याची क्षमता आहे.

बाबर आझम

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने तिन्ही फॉरमॅटमध्ये खूप प्रभावित केले आहे.बाबर आझमच्या T20 कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर या खेळाडूने आतापर्यंत 74 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.बाबर आझमने आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये 45.33 च्या सरासरीने आणि 129.45 च्या स्ट्राईक रेटने 2686 धावा केल्या आहेत.पाकिस्तानी संघ आपल्या कर्णधाराकडून आशिया चषकात आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा करत आहे.

विराट कोहली

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्ममधून जात असेल,पण त्याचा खेळ जगाला माहीत आहे. विराट कोहलीने फॉर्ममध्ये पुनरागमन केले तर भारतीय संघाचा दावा मजबूत होईल. त्याच वेळी, जर आपण विराट कोहलीच्या T20 कारकिर्दीबद्दल बोललो, तर या अनुभवी फलंदाजाने आतापर्यंत 99 आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त सरासरी आणि 137.66 च्या स्ट्राइक रेटने 3308 धावा केल्या आहेत.

युझवेंद्र चहल

भारतीय स्पिनर युझवेंद्र चहल हा टी20 विश्वचषक 2021मध्ये संघाचा भाग नव्हता. परंतु आयपीएल 2022 मध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर तो टीम इंडियामध्ये (India) परतला. युझवेंद्र चहलने आतापर्यंत 62 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत.या लेग-स्पिनरने 62 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 23.95 च्या सरासरीने आणि 8.1 च्या इकॉनॉमीने 79 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच या गोलंदाजामध्ये स्वतःहून सामन्याचा मार्ग बदलण्याची क्षमता आहे.

IND vs PAK
AIFF Elections : वालंका आलेमाव यांच्या उमेदवारीवर फुली; अर्ज फेटाळला

* मोहम्मद रिजवान

पाकिस्तानचा विकेटकिपर लंदाज मोहम्मद रिझवानने आपल्या फलंदाजीने खूप प्रभावित केले आहे. या पाकिस्तानी खेळाडूने आतापर्यंत 56 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. रिझवानने 56 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 50.36 च्या सरासरीने आणि 128.84 च्या स्ट्राइक रेटने 1662 धावा केल्या आहेत. गेल्या वर्षी भारताविरुद्धच्या T20 विश्वचषक सामन्यात रिझवानने शानदार खेळी करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता.

* रोहित शर्मा

भारतीय कर्णधार रोहित शर्मा त्याच्या वेगवान फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे भारतीय कर्णधाराला हिटमॅन म्हणूनही ओळखले जाते. विराट कोहली खराब फॉर्ममधून जात असल्याने भारतीय चाहत्यांच्या नजरा रोहित शर्मावर असतील. रोहित शर्माने आतापर्यंत 132 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. भारतीय कर्णधाराने 132 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 31.7 च्या सरासरीने आणि 140.27 च्या स्ट्राइक रेटने 3487 धावा केल्या आहेत.

हार्दिक पांड्या

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या त्याच्या झंझावाती फलंदाजीसोबतच गोलंदाजीतील योगदानासाठी ओळखला जातो. हार्दिक पांड्याने आतापर्यंत 67 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. भारतीय अष्टपैलू खेळाडूने 67 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 23.17 च्या सरासरीने आणि 144.04 च्या स्ट्राइक रेटने 834 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com