वसंत ऋतूमध्ये दक्षिण भारतात फिरा अन् अनुभवा निसर्गाची किमया

बहरणारा सूर्यप्रकाश, सुंदर फुले आणि या ऋतूतील पक्ष्यांचा किलबिलाट निसर्गप्रेमींना अतिशय आकर्षित करतो.
वसंत ऋतूमध्ये दक्षिण भारतात फिरा अन् अनुभवा निसर्गाची किमया
Published on
Updated on

देशाचे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी वसंत ऋतु (Spring Season) हा एक उत्तम ऋतू मानला जातो. बहरणारा सूर्यप्रकाश, सुंदर फुले आणि या ऋतूतील पक्ष्यांचा किलबिलाट निसर्गप्रेमींना अतिशय आकर्षित करतो. तुम्ही प्रवास करण्याचा विचार करत असाल तर हा सीझन तुमच्यासाठी योग्य आहे. तसे, तुम्ही उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत भारतातील अनेक ठिकाणांना (Hill stations) भेट देण्याची योजना आखू शकता . पण आज आम्ही तुम्हाला दक्षिण भारतातील (South India) अशाच काही हिल स्टेशन्सबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही या सुंदर ऋतूतील सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकता आणि आपल्या आयुष्याच्या या क्षणांना विस्मरणीय करू शकता.दक्षिण भारतात भेट देण्यासाठी अनेक मनोरंजक ठिकाणे आहेत. आपण दक्षिण भारतातील कोणत्या हिल स्टेशनला भेट देण्याचा विचार करू शकता ते जाणून घेऊया.

कुर्ग, कर्नाटक

कुर्ग हे एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. वसंत ऋतूमध्ये हे ठिकाण आणखीनच सुंदर बनते. इथे मैदानी भागात गाडी चालवणे आणि वसंताची ताजी हवा चेहऱ्यावर घेणे हा एक वेगळा अनुभव आहे. कूर्ग हे सुट्टीसाठी एंजॉय करण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.

वागमोन, केरळ

वागामन हे नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. पण याशिवाय तुम्ही इतर अनेक गोष्टींचा अनुभव घेऊ शकता. येथे तुम्ही अनेक साहसी उपक्रमही करू शकता. वसंत ऋतूत पॅराग्लायडिंगचा आनंद वेगळाच असतो. या दरम्यान केरळमधील टेकड्या अतिशय सुंदर दिसतात.

वसंत ऋतूमध्ये दक्षिण भारतात फिरा अन् अनुभवा निसर्गाची किमया
Beautiful Nails Tips: नखांचा पिवळेपणा घालवण्यासाठी घरगुती टिप्स

कुन्नूर, तामिळनाडू

हे हिल स्टेशन तामिळनाडूमधील एक सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. वसंत ऋतूमध्ये नव्याने बहरलेली फुले अतिशय आकर्षक दिसतात.या सुंदर ठिकाणच्या टेकड्या तुम्हाला भुरळ घालतील. तुम्ही खरच निसर्गप्रेमी असाल तर या सुंदर हिरव्यागार दिसणाऱ्या टेकड्यांच्या प्रेमात तुम्ही नक्कीच पडाल.

अराकू व्हॅली, आंध्र प्रदेश

हे आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम जिल्ह्यातील एक हिल स्टेशन आहे. हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. अराकू व्हॅलीमध्ये आदिवासी संस्कृतींसह इतरही अनेक मनोरंजक गोष्टी आहेत. कॉफी प्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गापेक्षा सुंदर आहे असे म्हणालया हरकत नाही. येथे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत फिरायला जाऊ शकता.

वसंत ऋतूमध्ये दक्षिण भारतात फिरा अन् अनुभवा निसर्गाची किमया
पुरुषांनो, कशा प्रकारे घेताय तुम्ही त्वचेची काळजी?

मुन्नार, केरळ

मुन्नारच्या चहाच्या बागा आणि टेकड्यांचे सुंदर दृश्य पाहण्यासाठी वसंत ऋतु हा एक उत्तम ऋतू आहे. येथे तुम्हाला आजूबाजूची हिरवळ पाहायला मिळेल. वसंत ऋतुत या ठिकाणी जाण्याचं प्लॅनिंग करत असाल तर तुम्हाला निसर्गाच्या वेगवेगळ्या किमया बघायला मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com