प्राणायाम आणि ध्यान, योग (yoga) आसन किंवा मुद्रा, निरोगी त्वचा(healthy skin) ठेवण्यास मदत करतात. बर्याच लोकांना याची जाणीव नसली तरी, त्वचेची काळजी ही आरोग्याचा एक आवश्यक घटक आहे. जेव्हा आपण अति काळजी करतो, तेव्हा याचा आपल्या आरोग्यावर खूप परिणाम होतो, तसेच याचा त्वचेवर ही परिणाम दिसून येतो, ज्यामुळे त्वचेवर मुरुमे, सुरकुत्या येण्यास सुरवात होते.
“म्हणूनच, चरबीयुक्त, तेलकट आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळून आपल्या आहाराकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. आपली त्वचा हायड्रेट करण्यासाठी आपण आपल्या पाण्याचे सेवन वाढवले पाहिजे आणि सूर्यप्रकाशास सामोरे जात असल्यास चांगल्या प्रतीचे सनस्क्रीन वापरले पाहिजे.
“आपली बैठी जीवनशैली आपल्याला शारीरिक हलचालींपासून दूर ठेवते, ज्यामुळे आपल्याला अकाली वृद्धत्व, सुरकुत्या आणि बारीक रेषा येण चालू होत. प्राणायाम आणि ध्यान पद्धतींसह योग आसन निरोगी त्वचा ठेवण्यास मदत करते. निरोगी त्वचेसाठी खास योगासने
बलासना - बेबी क्रेन पोझ
करण्याची पद्धत
- मार्जरीसनात सुरुवात करा
आपली कोपर सपाट खाली ठेवा
आपले बोट पुढे असले पाहिजेत आणि ते वेगळे पसरले पाहिजेत
अशा प्रकारे पुढे झुकून घ्या की तुमचे शरीराचे सर्व वजन तुमच्या ट्रायसेप्सवर सरकेल
तुमचा समतोल शोधा आणि हळू हळू तुमचे दोन्ही पाय जमिनीवरून उचला. आपले पाय एकत्र आणा
पदहस्तासन
करण्याची पद्धत
समष्टीमध्ये उभे राहून सुरुवात करा
श्वासोच्छ्वास करा आणि हळूवारपणे आपले वरचे शरीर नितंबांपासून खाली करा आणि आपले नाक आपल्या गुडघ्यांना स्पर्श करा
पायाच्या दोन्ही बाजूला तळवे ठेवा
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.