Year Ender 2023: मोये-मोये ते द बॉइज् पर्यंत हे मिम्स सर्वाधिक झाले ट्रेंड

यंदा वर्षभरात सोशल मडियावर अनेक मिम्स व्हायरल झाले आहेत.
Year Ender 2023
Year Ender 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Year Ender 2023: 2023 संपायला अवघे काही दिवस राहिले आहेत. या वर्षात अनेक मीम्स सोशल मिडियावर व्हायरल झाले. गुगलच्या इअर इन सर्च 2023 मध्ये टॉप सात मीम्सचा समावेश करण्यात आला आहे. जे भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक सर्च केले आहे. चला जाणून घेऊया यंदाचे वर्ष गाजवणारे मजेदार मीम्स.

भूपेंद्र जोगी मिम

क्वचितच कोणी विचार केला असेल की एखाद्या माणसाची एक छोटीशी मुलाखत भारतात सर्वात जास्त शोधली जाणारी मजेदार मीम होईल. भूपेंद्र जोगी मीम 2018 पासून सुरु झाला आहे. जरी हा मीम पाच वर्ष जुना असला तरी यंदा हा मीम सर्वात ट्रेंडिंग मीम ठरला आहे.

सो ब्युटीफुल सो एलेगेंट

एका इंस्टाग्राम लाइव्ह सेशन दरम्यान एका स्थानिक महिलेने उच्चारलेले एक काही शब्द हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक सर्च केले जाणारे मीम बनले. यावर अनेक लोकांनी मीम्स तयार करून सोशल मिडियावर पोस्ट केले आहे.

द बॉइज

द बॉईज ही एक डार्क कॉमेडी आणि अॅक्शन मालिका आहे. यामध्ये सुपरहिरो आहेत जे त्यांच्या शक्तींचा वाईट मार्गाने वापर करतात. हा मीम इमॅजिन ड्रॅगन्सच्या 'बोन्स' गाण्यासोबत जोडला गेला आहे.

एल्विश भाई

एल्विश यादव हा एक भारतीय YouTuber आहे. ज्याने भारतीय टेलिव्हिजन रिअॅलिटी शो "बिग बॉस" चा 2023 सीझन जिंकला. विजयासोबतच त्याची लोकप्रियता वाढली. एल्विशच्या एका चाहत्याच्या मुलाखतीनंतर हा मीम सोशल मीडियाच्या दुनियेत व्हायरल झाला.

मोये मोये

2023 मध्ये सर्बियन गायक-गीतकार तेजा डोरा यांनी गायलेल्या 'झानम' गाण्यापासून मोये मोये मेमेची उत्पत्ती झाली आहे. हे गाणे सुपरहिट झाले असेल पण इंटरनेटने हे गाणे विनोदासाठी वापरले आणि गाण्याचा संपूर्ण उद्देशच बदलून टाकला. या गाण्यावर अनेक लोकांनी मीम्स तयार करून सोशल मिडायावर व्हायरल केले आहे.

आय

2023 च्या या यादीतील सर्वात मनोरंजक मीम म्हणजे आइ मीम. ज्याची सुरुवात एका विद्यार्थ्याच्या छोट्या मुलाखतीने झाली. आदित्य कुमार या बिहारमधील शाळकरी मुलाला त्याच्या आवडत्या विषयाबद्दल विचारण्यात आले, ज्यावर त्याने उत्तर दिले, 'आय' ('काय?' साठी बोलतात). मुलाखतकाराने त्याच्या प्रश्नाची पुनरावृत्ती केली आणि यावेळी आदित्यने 'वांगी' असे उत्तर दिले.

स्मर्फ कॅट

या मेममध्ये स्मर्फ आणि मांजर यांचे मिश्रण असलेला प्राणी, टोपी घातलेला आणि अॅलन वॉकरचे 'स्पेक्टर' गाणे वापरताना दाखवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com