Worst Foods For Memory: या 5 पदार्थांमुळे तुमची स्मरणशक्ती होऊ शकते कमकुवत

Healthy Tips: स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपण अनेक पदार्थांचे सेवन करतो.
Worst Foods For Memory:
Worst Foods For Memory:Dainik Gomantak
Published on
Updated on

स्मरणशक्ती (Memory) कमजोर होणे हे वृद्धत्वाचे लक्षण मानले जाते. परंतु काही वेळा लहान वयातच व्यक्तीची स्मरणशक्ती कमजोर होऊ लागते. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती आपली स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी कधी बदाम तर कधी अक्रोडचे सेवन करतात. कधी कधी या उपायांचाही उपयोग होत नाही. त्यामागचे कारण म्हणजे तुमच्या आहारात अशा काही पदार्थांचा समावेश असू शकतो ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती कमकुवत होऊ शकते. (Worst Foods For Memory News)

memory
memoryDainik Gomantak

जसे मेंदूशी संबंधित कोणतेही आजार जसे ब्रेन ट्यूमर, डोक्याला दुखापत, तणाव, अपुरी झोप इत्यादीमुळेही व्यक्तीची स्मरणशक्ती कमी होते. याशिवाय माणसाची स्मरणशक्ती कमकुवत होण्यामागे अनेक खाद्यपदार्थांचाही समावेश शकतो. चला जाणून घेऊया कोणते पदार्थांचे सेवन टाळावे.

faty food
faty food Dainik Gomantak

* चरबी आणि कोलेस्टेरॉल युक्त
व्यक्तीच्या स्मरणशक्तीवर केलेल्या संशोधनानुसार, ज्या पदार्थांमध्ये कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते त्यांचा मेंदूवर वाईट परिणाम होतो. अशा पदार्थामुळे पेशींमध्ये जळजळ होते. त्यामुळे व्यक्तीची स्मरणशक्ती कमजोर होऊ लागते. त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन कमीत कमी ठेवावे.

milk products
milk productsDainik Gomantak

तूप, पनीरचा कमीत कमी वापर
चीज, तूप, दही यामध्ये फॅट आणि कोलेस्टेरॉल मोठ्या प्रमाणात आढळते, जे व्यक्तीच्या आरोग्यासाठी चनगळे नाही. तुम्ही विचार करत असाल की दही हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, मग त्याचे सेवन केल्याने नुकसान कसे होऊ शकते.दह्यात असलेले फॅट फायद्याऐवजी नुकसान करते. त्यामुळे दह्याचा मठ्ठा म्हणजेच ताक बनवून सेवन करा.

drink
drinkDainik Gomantak

अल्कोहोल
अल्कोहोलमुळे व्यक्तीचे यकृत तर कमकुवत होतेच पण स्मरणशक्तीही कमजोर होते. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने व्यक्तीची विचार करण्याची शक्ती कमी होते.

Soya
SoyaDainik Gomantak

सोया -
सोया हा प्रोटीनचा उत्तम स्रोत मानला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की सोयाचे जास्त सेवन केल्याने तुम्हाला मेंदूशी संबंधित विकार अधिक वाढू शकतात.

sweet
sweet Dainik Gomantak

गोड पदार्थ-
जास्त साखर खाणे किंवा जास्त गोड पदार्थ खाणे याचाही मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com