World Tourism Day 2022: गोव्यातील किनाऱ्यासह 'या' सुंदर ठिकाणांना द्या भेट

गोव्यातील समुद्रकिनारे,खाद्यपदार्थ, आणि सुंदर ठिकांणाचा आनंद घेण्यासाठी आयुष्यात गोव्याला नक्की भेट द्या.
World Tourism Day 2022 |Goa Trip
World Tourism Day 2022 |Goa TripDainik Gomantak

दरवर्षी जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) 27 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात 1980 मध्ये झाली आणि त्याच वर्षी पहिला जागतिक पर्यटन दिवस साजरा करण्यात आला. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये पर्यटनावर होणाऱ्या परिणामाबाबत जागृती करणे. पर्यटन जगाला जोडते आणि एकमेकांच्या संस्कृतीबद्दल ज्ञान देते , पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे भारतातील पर्यटन क्षेत्रात रोजगार वाढत आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्त जाणून घेउया गोव्यातील (Goa) सुंदर आणि नयनरम्य ठिकांणे कोणती आहेत.

* आग्वाद किल्ला

आग्वाद किल्ला 17 व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला आणि दीपगृह आहे. हे सिंक्वेरिम बिचवर असलेल्या वसलेले आहे. हा किल्ला मुळत: डच आक्रमणाविरुद्ध बांधला गेला होता. गोव्यातील (Goa) एक भव्य प्रेक्षणीय भव्य स्थळ म्हणून ओळखले जाते. यामुळे गोव्याला गेल्यावर या किल्ल्याला भेट द्यायला विसरू नका.

* दूधसागर धबधबा

गोव्यातील (Goa) दूधसागर धबधबा हे अनेक पर्यटकांचे मन वेधून घेणारे ठिकाण आहे. मंडोवी नदीवर वसलेले आहे. तुम्ही येथे जीप सफरीचा आनंद घेवु शकता. पण तुम्हाला जर खरा आनंद घ्यायचा असेल तर येथे तुम्ही पावसाळ्यात ट्रेकिंग करण्यासाठी जावु शकता.

* बॅसिलिका ऑफ बॉम जीझस

गोव्यातील हे एक अविश्वसनीय चर्च (Church) असून यूनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. ही सुंदर वास्तुकला 1605 पासून आहे. हे रोमन कॅथोलिक बॅसिलिका ख्रिश्चन धर्माच्या इतिहासात एक महत्वाची खूण असल्याचे म्हटले जाते. गोव्यातील एक अतिशय महत्वाचे पर्यटन स्थळ आहे.

* गोव्यातील प्रसिध्द मंदिरे

जेव्हा तुम्ही समुद्रकिनारी फिरायला आणि पार्टी कारीला गोव्याला जायचा प्लन करत असाल तर इथली भव्य मंदिरे (Temple) पाहायला विसरू नका. जसे, शांता दुर्गा मंदिर, महादेव मंदिर, चंद्रेश्वर भूतनाथ मंदिर, ब्रह्मा मंदिर, सप्तकोटेश्वर मंदिर यासारखे अनेक मंदिरे पाहायला मिळतील

World Tourism Day 2022 |Goa Trip
Goa Trip: पहिल्यांदा गोव्यात जाणाऱ्यांनी 'या' 6 गोष्टी ठेवा लक्षात, नाहीतर तुमचा खिशा होऊ शकतो खाली

* गोव्यातील लेणी

गोव्यातील सुंदर समुद्रकिनारे (Beach) फिरल्यानंतर, तुम्ही इथल्या लेण्यांचे दर्शन करण्यासाठी निघू शकता. ज्या कलेचा प्रभाव असलेला भूतकाळ प्रतिबिंबित करतात. उदाहरणार्थ, गोव्यातील लामगौ लेणी, लॅटराइटपासून कोरलेली, जी काहीशी नाजूक आहे. मोठ्या प्रमाणात पाम वृक्षांनी वेढलेल्या, या लेणी गोव्यातील प्रमुख आकर्षणांपैकी एक आहेत. हे ठिकाण पणजीपासून (Panji) सुमारे 25 किमी अंतरावर असलेल्या बिचोलीममध्ये वसलेले आहे.

* अंजुना फ्ली मार्केट

गोव्यातील अंजुना फ्ली मार्केट (Anjuna Flea Market) हे प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे फ्ली मार्केट फक्त बुधवारीच सुरू असते. येथे इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून ते कपडे आणि फळांपर्यंत अनेक गोष्टी ऑफरवर असतात. पर्यटकांचे (Tourist) हे एक आवडते ठिकाण आहे.

* संग्रहालय

गोव्याचे (Goa) हे एक अनोखे संग्रहालय आहे. येथे तुम्हाला गोव्याचे जुने मार्ग, गोवन लोकांच्या चालीरीती पाहायला मिळतील. येथे तुम्हाला रेस्टॉरंट, डान्स फ्लोअर आणि बऱ्याच गोष्टीचा आनंद घेता येईल.

* नाईट लाईफ

गोव्यात गेल्यावर तुम्ही क्लब किंवा पबपासून दूर राहू शकजत नाही. येथे तुम्ही तुमच्या आवडत्या पेयासह गोव्यातील सर्वोत्तम नाइटक्लब आणि पबसह कॅसिनोचा आनद घेवू शकता. शिवाय तुम्ही वॉटर स्पोर्ट्स अ‍ॅक्टिव्हिटी, बाइक राईड, गोवा म्युझियम, डॉल्फिन व्ह्यू, घृतसागर वॉटर फॉल्स,मसाज थेरपी आणि लोकल शॉपिंगचा आनंद घेवू शकता

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com