Benefits Of Walking: हृदय निरोगी ठेवण्याबरोबर 'हा' व्यायाम देतो अनेक आजारांपासून मुक्ती

Benefits Of Walking: महत्वाचे म्हणजे, बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे फक्त शारिरिक आरोग्यावरच नाही तर मानसिक आरोग्यावरदेखील परिणाम होत असतो.
Benefits walking
Benefits walkingDainik Gomantak
Published on
Updated on

Benefits Of Walking: सध्या आपली जीवन जगण्याची पद्धत बदलत चालली आहे. बैठे काम वाढत असून आपल्या शरिराची हालचाल कमी होत आहे. मोबाईल, लॅपटॉप यामुळे मैदानावरचे खेळ खेळणे बंद होत आहे.

यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, कोलेस्ट्रॉलची वाढ असे अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.

महत्वाचे म्हणजे, बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे फक्त शारिरिक आरोग्यावरच नाही तर मानसिक आरोग्यावरदेखील परिणाम होत असतो.

त्यामुळे तुम्ही तुमच्या निरोगी आरोग्यासाठी दररोज एक तास व्यायाम केला पाहिजे असे अनेक तज्ञ सांगतात. यामध्ये तुम्ही विविध व्यायामप्रकारांचा समावेश करु शकता.

त्यामुळे तुम्हाला धावणे, योगासने, सायकलिंग असे व्यायामाचे प्रकार आवडत नसतील तर तुम्ही चालण्याचा व्यायाम करणे महत्वाचे ठरते.

काय आहेत चालण्याचे फायदे

१. मानसिक आरोग्य उत्तम राहते

तुमचे दैनंदीन काम व्यवस्थित चालू राहण्यासाठी तुमचे मानसिक आरोग्य उत्तम राहणे महत्वाचे ठरते. चालणे तुमच्या शारिरिक आरोग्यासाठी जसे महत्वाचे आहे तसे ते तुमच्या मानसिक आरोग्यासाठीदेखील महत्वाचे ठरते.

त्यामुळे ताणतणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी चालणे हा व्यायामप्रकार महत्वाचे ठरते.

२. वजन कमी करण्यास मदत करते

जर तुम्ही वजन वाढण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर चालणे तुम्हाला मदत करते. चालणे हा कॅलरीज बर्न करण्याचा एक चांगला मार्ग आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर दररोज 30 मिनिटे चालण्याचा प्रयत्न करा.

महत्वाचे म्हणजे, चालण्याबरोबरच तुम्ही इतर व्यायामप्रकारदेखील केले पाहिजेत. यामध्ये सातत्य ठेवले पाहिजे. वजन कमी करण्यासाठी व्यायामाबरोबरच आहाराकडेदेखील लक्ष दिले पाहिजे.

३. कँन्सरचा धोका कमी

चालणे काही प्रकारच्या कँन्सरचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.

४. हृदयाचे आरोग्य सुधारते:

चालणे हृदय गती आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करते. हे हृदयरोग, स्ट्रोक आणि हृदयाशी संबंधित इतर समस्यांचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.

५. मधुमेह नियंत्रण

चालणे टाइप 2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते.

काही संशोधनात असे समोर आले आहे की, 70 वर्षे वयाच्या लोकांसाठी अतिरिक्त 500 पावले चालल्याने हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका 14 टक्क्यांनी कमी होतो.

शास्त्रज्ञांच्या मते, दररोज 2000 पावले कमी चालणाऱ्यांच्या तुलनेत दररोज 4500 पावले चालणाऱ्यांमध्ये गंभीर आजारांचा धोका कमी असल्याचे दिसून आले.

अमेरिकन हार्ट असोसिएशन कॉन्फरन्समध्ये सादर केलेल्या अभ्यासानुसार, अतिरिक्त 500 पावले चालल्याने, लोकांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांमध्ये 14 टक्के घट दिसून आली.

वाढत्या वयाबरोबर शारीरिक हालचालदेखील महत्त्वाचे आहे, नियमित चालणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com