World Heart Day 2023: हृदय व्यवस्थित धडकतंय ना? निरोगी हृदयासाठी कशी घ्याल काळजी, महत्वाच्या टीप्स

World Heart Day: कधीकाळी हृदयविकार हा वृद्धांना होणारा आजार मानला जायचा मात्र आता विशीतल्या तरुणांनादेखील हृदयविकाराचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते.
World Heart Day
World Heart DayDainik Gomantak
Published on
Updated on

World Heart Day: आज जागतिक हृदय दिन आहे. दरवर्षी २९ सप्टेंबरला जागतिक स्तरावर हा दिवस साजरा केला जातो. जागतिक हृदय दिन 2000 साली वर्ल्ड हार्ट फेडरेशन (WHF) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांनी संयुक्तपणे सुरू केला. हृदयाशी संबंधित आजारांकडे लोकांचे लक्ष वेधून त्यांना या आजाराबाबत जागरुकता निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

आपले हृदय जोपर्यंत धडकत आहे तोपर्यंत आपले शरीर व्यवस्थित काम करत असते. त्यामुळे आपल्या हृदय निरोगी राहावे यासाठी काळजी घेणे महत्वाचे असते.

कधीकाळी हृदयविकार हा वृद्धांना होणारा आजार मानला जायचा मात्र आता विशीतल्या तरुणांनादेखील हृदयविकाराचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते.

हृदयावर कोणत्या गोष्टींचा होतो परिणाम?

आपली बदलत्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. फास्टफुड खाण्याचे वाढते प्रमाण, शरिराची कमी हाचचाल, पोषक आहाराचा अभाव, व्यायाम न करण्याची सवय अशा अनेक गोष्टींचा प्रभाव तुमच्या शरिरावर होत असतात. यातून लठ्ठपणा, मधूमेह, कोलेस्ट्रॉल, ब्लडप्रेशर यासारख्या अनेक शारिरिक व्याधींना सामोरे जावे लागते. त्याचा परिणाम तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर देखील होतो.

याशिवाय तुम्ही जर सतत ताणतणावाचा सामना करत असाल तरीदेखील तुम्हाला हृदयविकाराचा सामना करावा लागू शकतो.

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, १८ ते ६५ वयोगटातील लोकांनी आपल्या दिनचर्येवर जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे.

World Heart Day
World Heart Day 2023: स्वयंपाकघरातील 'हे' 7 मसाले हृदयाच्या आरोग्यासाठी ठरतात फायदेशीर

कशी काळजी घेतली जाऊ शकते?

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, हृदयविकाराच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे लक्ष दिले आणि महत्वाच्या आरोग्यदायी सवयींना आपल्या दिनचर्येचा भाग बनवले तर हृदयाशी संबंधित आजाराचा धोका ८० टक्के कमी होईल. असे म्हटले जाते की, तुमच्या खाण्यापिण्याचा, झोप घेण्याचा आणि व्यायामाविषयी तुम्ही जर काही नियम पाळले तर तुमचे हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत होईल.

काय आहेत सामान्य लक्षणे?

1. छातीत दुखण्यास सुरुवात होते.

2. पोटाच्या वरच्या बाजूस डाव्या हाताकडे किंवा खांद्याकडे वेदना सुरु होतात. काही वेळा दात किंवा जबड्यातदेखील दुखण्यास सुरुवात होते.

3. श्वास घेण्यात अडचण निर्माण होते.

4. झोपल्यानंतर तुम्हाला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नसेल तर तुम्ही घोरण्यास सुरुवात करता.

अॅटॅक आल्यानंतर या गोष्टी करा.

1. जर रुग्ण शुद्धीत नसेल तर त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न करु नका.

2. लगेच जवळच्या दवाखाण्यात घेऊन जा.

3. अॅस्पिरिनची गोळी खायला द्या

पुरेसा व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप, पोषक अन्न, ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन या सगळ्यातून आपण आपल्या आरोग्याची , हृदयाची योग्य काळजी घेऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com