Workout Tips: वर्कआउट केल्यानंतर क्रॅम्प येत असेल तर 'या' चुका करू नका

Workout Tips: अनेक लोक फिट राहण्यासाठी वर्कआउट करतात. पण अनेक वेळा त्यांना क्रॅम्प येतो. अशावेळी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
Workout Tips
Workout TipsDainik Gomantak

Workout Tips: स्वत:ला निरोगी आणि फिट ठेवायचे असेल तर वर्कआउट करणे गरजेचे आहे. अनेक लोक जिममध्ये जातात, रनिंग करतात किंवा योगा करतात. वर्कआउट केल्याने शरिर अॅक्टिव्ह राहते.

पण अनेकवेळा वर्कआउट केल्यानंतर लोकांना क्रॅम्प येतात. हे खुप सामान्य आहे परंतु यामुळे वेदना होतात. तसेच थकवा जाणवतो. ही समस्या कमी करण्यासाठी कोणते उपाय करावे हे जाणून घेऊया.

हायड्रेटेड रहा

शरीरात क्रॅम्प येत असेल तर नेहमी हायड्रेटड राहणे खुप गरजेचे आहे. डिहायड्रेशनमुळे अनेक वेळा क्रॅम्प येतो. जनर्ल ऑफ एॅथलेटिक ट्रेनिंगमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे सुचित केले की डिहायड्रेशनमुळे क्रॅम्प जास्त येतात. म्हणून वर्कआउटच्या आधी, दरम्यान आणि नंतर तुम्ही पुरेसे पाणी प्यावे.

वॉर्मअप आणि कूलडाऊन

जर तुम्हाला वर्कआउटनंतर क्रॅम्प येत असेल तर नेहमी वॉर्मअप आणि कूलडाऊन करावे. वॉर्मिंग केल्याने तुमचे स्नायू अ‍ॅक्टिव्हिटीसाठी तयार होतात, ज्यामुळे क्रॅम्प येण्याची शक्यता बर्‍याच प्रमाणात कमी होते. त्याचप्रमाणे, वर्कआउटची तीव्रता हळूहळू कमी करण्यासाठी कूलडाउन व्यायाम करावा. यामुळे देखील क्रॅम्प टाळण्यासाठी देखील मदत करेल.

स्ट्रेचिंग करावे

तुम्हाला माहीत नसेल, पण स्ट्रेचिंगमुळे शरीरातील क्रॅम्प्स दूर होण्यासही मदत होते. खरं तर जेव्हा तुम्ही स्ट्रेच करता तेव्हा फ्लेक्सिबिलीटी वाढवण्यास मदत होते. तसेच स्नायूंचा कडकपणा देखील कमी होतो. म्हणून, स्ट्रेचिंगचा करणे गरजेचे आहे. स्कॅन्डिनेव्हियन जर्नल ऑफ मेडिसिन अँड सायन्स इन स्पोर्ट्समध्ये प्रकाशित झालेल्या रिव्यूनुसार स्ट्रेचिंगमुळे स्नायूंच्या क्रॅम्पचा धोका कमी होतो.

एक्सरसाइज इंटेसिटी

तुमच्या व्यायामाची तीव्रता देखील स्नायूंच्या क्रॅम्पसाठी जबाबदार असू शकते. खरं तर, बर्‍याच वेळा आपण पहिल्याच सेटमध्ये खूप जास्त वजन उचलण्याचा प्रयत्न करतो किंवा अचानक वर्कआउटची तीव्रता आणि कालावधी वाढवतो, ज्यामुळे स्नायूंना क्रॅम्प होण्याची शक्यता खूप वाढते.

इलेक्ट्रोलाइटचे संतुलन राखणे

पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारख्या इलेक्ट्रोलाइट्समध्ये असंतुलन झाल्यामुळे क्रॅम्प येऊ शकतात. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ स्पोर्ट्स न्यूट्रिशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार इलेक्ट्रोलाइट असंतुलन, विशेषत: मॅग्नेशियम आणि पोटॅशियमच्या कमी पातळीमुळे क्रॅम्पचा धोका वाढतो. यामुळे व्यायामादरम्यान इलेक्ट्रोलाइट्स समृद्ध पदार्थ किंवा पेयांचे सेवन करावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com