Women's Day 2024: 'या' खास पद्धतीने पत्नीचा महिला दिन बनवा खास

Women's Day Celebration Idea: तुम्ही तुमच्या पत्नीचा महिला दिन खास बनवायचा असेल तर पुढील गोष्टींची मदत घेऊ शकता.
Women's Day 2024
Women's Day 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

how make your wife love partner Women's Day 2024 Special

महिला या कुटुंब, समाज आणि राष्ट्र विकासाच्या मार्गावर पुढे जाऊ शकतात. नवीन विचार, दृष्टीकोन आणि समृद्धीच्या दिशेने समाजाला सुधारण्यासाठी आणि संघटित करण्यासाठी महिला नेहमीच कार्यरत असतात.स्त्रीया त्यांच्या वैशिष्ठ्ये आणि कर्तृत्वाने समृद्धीच्या नव्या उंचीवर पोहोचू शकतात. मात्र, त्यांना समाजात संधी आणि सन्मान मिळणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीने महिलांच्या समाजातील योगदानाबद्दल आदर आणि आभार मानले पाहिजेत.

यासोबतच महिलांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून देण्यासाठी महिला असणे हा शाप नसून वरदान आहे, हेही सांगण्याची गरज आहे. या भावना व्यक्त करण्यासाठी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. यानिमित्त्याने महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीवही करून दिली जाते. तसेच महिलांच्या योगदानाची समाजाला जाणीव करून दिली जाते.

तुम्ही तुमच्या पत्नीचा आंतरराष्ट्रीय महिला दिन देखील खास बनवू शकता. या निमित्ताने त्यांना स्पेशल फिल करून देऊ शकता. यासाठी पुढील गोष्टींची मदत घेऊ शकता.

आवडी-निवडींची काळजी घ्या

कोणत्याही महिलेसाठी तिच्या जोडीदाराला तिच्या आवडी-निवडी समजून घेणे आणि तिच्या आवडीनिवडींची काळजी घेणे यापेक्षा अधिक आनंदाची गोष्ट नसते. आपल्या समाजात स्त्रिया मग त्या माता, बहिणी किंवा पत्नी असो, प्रत्येक काम संपूर्ण कुटुंबाच्या आवडी-निवडी लक्षात घेऊनच करतात. पण तुम्हाला तुमच्या कुटुंबातील महिलांच्या आवडीनिवडी चांगल्या प्रकारे माहीत आहेत का? त्यांच्या आवडी-निवडी जाणून घेऊन तुम्ही त्यांच्यासाठी काही केले तर तुम्ही त्यांना स्पेशल फिल करून देऊ शकता.

निर्णयांमध्ये पाठिंबा द्यावा

भारतात बहुतांश महिला त्यांच्या आयुष्याशी संबंधित निर्णय स्वत: घेत नाही. त्या निर्णयाममध्ये पुरुषांची संमती नक्कीच असते. स्वावलंबी महिलांची स्थितीही अशीच आहे. महिलांना आपण पुरुषांपेक्षा कमी नाही हे जाणवण्यासाठी, त्यांना निर्णय घेण्यास प्रोत्साहित केले पाहिजे आणि त्यांच्या निर्णयात त्यांचे समर्थन केले पाहिजे. तुमच्या जोडीदाराला आयुष्यात काय करायचे आहे हे ठरवू द्या.

'ती' चे म्हणणे ऐका

तुमच्या पत्नीला ती खुप खास आहे असे वाटण्यासाठी तिच्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीकडे लक्ष द्या. ती काय म्हणते ते काळजीपूर्वक ऐका आणि समजून घ्या. जेव्हा तुमची पत्नी तुम्हाला काही सांगत असेल तेव्हा तिचे शांतपणे ऐका मध्येच बोलू नका. यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना आपण स्पेशल असल्याची जाणीव होते

सुंदर आणि उपयुक्त गिफ्ट द्या

तुम्ही तुमच्या जोडीदाराला स्पेशल फिल करून देण्यासाठी खास आणि उपयुक्त गिफ्ट देऊ शकता. तुमच्या पत्नीला सरप्राईज गिफ्ट द्या किंवा तिला तिच्या आवडीचे काहीतरी गिफ्ट द्या. यामुळे ती खुप स्पेशल आहे असे वाटेल.

कुकिंग करणे

महिलादिनानिमित्त तुमच्या लाडक्या पत्नीसाठी तीचा आवडता पदार्थ बनवू शकता. यामुळे ती किती स्पेशल आहे याची जाणीव होईल. तुम्ही तुमच्या पत्नीसाठी केके, कुकीज्, पास्ता,यासारखे पदार्थ बनवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com