ज्या महिलांना युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनची समस्या आहे त्यांनी जांभूळ जरूर खावं

तुम्ही एका दिवसात 70 ग्रॅम जामुन खाऊ शकता. यापेक्षा जास्त सेवन केल्याने रक्तातील शुगर लेवल कमी होण्याची शक्यता आहे
Jamun
JamunDainik Gomantak
Published on
Updated on

हल्ली जाभंळाचा मोसम आहे. आणि जांभूळ हे एक मोसमी फळ आहे त्यामुळे ते पावसाळ्याच्या सुरवातीला बाजारात येते. जामुनमुळे पित्ताचा त्रास कमी होतो. शरीरात पित्तदोष वाढल्यामुळे अनेक रोग होतात, त्या सर्व रोगांवर नियंत्रण करण्यात जांभूळ हे एक प्रभावी फळ आहे.असे काही आजार आहेत ज्यावर जांभूळ एक खास आणि रामबाण उपाय ठरू शकते. ते कसे खावे, कोणत्या प्रमाणात आणि केव्हा खाऊ नये, या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. (Jamun Benefits)

Jamun
भोपळ्याच्या बियांचे जास्त सेवन करणे आरोग्यासाठी घातक
  • जांभूळ स्वादुपिंड सक्रिय करते आणि मधुमेह नियंत्रित करते त्यामुळे मधूमेह पूर्णपणे कमी होण्याची शक्यता जास्त असते.

  • ज्यांची पचनशक्ती खराब असते आणि अनेकदा पोटाच्या समस्या असतात त्यांनीही रोज जांभूळ खावे.

  • जर इरिटेबल बोवेल सिंड्रोम म्हणजेच IBS ची समस्या असेल तर त्यांनीही जांभूळचे सेवन रोज करावे.

  • IBS असण्याचं सर्वात मोठं लक्षण म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा मोशनचा त्रास होते.

  • जांभूळ कोलेस्ट्रॉल कमी करते, त्यामुळे ते हृदयासाठी चांगले असते.

  • तुमच्या हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी तुम्ही दररोज जांभूळचे सेवन करावे.

  • जर तुमच्या मुलाला झोपेत लघवी करण्याती समस्या असेल तर तुम्ही त्याला रोज जांभूळ खायला द्यावे. त्याची समस्या दूर होईल आणि मूल निरोगी होईल.

  • ज्या महिलांना युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच UTI ची समस्या आहे, त्यांनी रोज जांभूळ खाल्ल्याने त्यांची समस्या लवकर दूर होते. ज्यांना पांढर्‍या स्रावाची समस्या आहे, त्यांनीही जांभूळचे दररोज सेवन करावे.

  • जांभूळ किडनीच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे, त्यामुळे किडनीची कार्यक्षमता वाढते.

  • जर तुम्हाला फॅटी लिव्हरची समस्या असेल किंवा तुम्हाला यकृताचा त्रास असेल तर रोज जांभूळ खा, तुमचे यकृत लवकर निरोगी होईल.

Jamun
Feng Shui Wallet Tips: पर्सचा रंग ठेवा 'असा' की पैशांची कमतरता होइल दुर
  • जांभूळ खाण्याची योग्य पद्धत

  1. तुम्ही एका दिवसात 70 ग्रॅम जामुन खाऊ शकता. यापेक्षा जास्त सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्याची समस्या उद्भवू शकते.

  2. जांभूळ नेहमी स्वच्छ पाण्याने धुवून काळे मीठ किंवा गुलाबी मीठ टाकून खावे. मिठासह जांभूळ खाल्ल्याने त्याचे गुणधर्म वाढतात आणि शरीराला त्याचे फायदे लवकर मिळतात.

  3. शुगरची समस्या असल्यास जांभूळ खाल्ल्यानंतर त्याची बी पण खा. तुमची शुगर पूर्णपणे नियंत्रणात राहील.

  4. जांभूळामध्ये अनेक खनिजे असतात. उदाहरणार्थ, फ्रक्टोज, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, जस्त हे सर्व शरीराच्या पचनापासून हाडे मजबूत करण्यापर्यंत अतिशय प्रभावीपणे काम करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com