रसाळ गोमटे चवीबरोबरच... फणसाचा हंगाम झाला सुरू

फणसात जीवनसत्वाबरोबर लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम या खनिजांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात असते.
Jackfruit
Jackfruit Dainik Gomantak
Published on
Updated on

फणसाची चव माहिती असणाऱ्या कोणताही माणसाला फणस पाहिल्यानंतर तो खाण्याचा मोह होण्यापासून रोखता येणे शक्य नाही. या अवीट, रसाळ, गोड आणि मन तृप्त करणाऱ्या फणसाचे आरोग्यासाठीही खूप फायदे आहेत. सध्या फणसाचा हंगाम सुरू असून बाजारातही तो सहज उपलब्ध आहे. त्यामुळे त्याची चव घेतलीच पाहिजे.

फणसाच्या कापा व बरका फणस या दोन मुख्य जाती आहेत. वरून काटेरी आणि आतून रसाळ असणाऱ्या या फळांच्या गऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवनसत्त्व अ, ब तसेच प्रथिने आढळून येतात. या जीवनसत्वाबरोबर लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम या खनिजांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात असते. 

Jackfruit
'कोकणी भाषा ही गोवेकरांची ओळख'

फणस शरीरासाठी शक्ती व आरोग्यदायी आहे, जठराग्नी सतेज बनविणारा आहे. याच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती सुधारते, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य आणि नियमित रक्तदाब याची हमी मिळते व पचन सुधारते. फणस कर्करोगही प्रतिबंधित करतो, हाडे मजबूत करतो व रक्त गुणवत्ता सुधारायलाही मदत करतो.

फणसाच्या गऱ्यापासून जॅम, जेली, मुरंबा, कँडी, चटणी, आईस्क्रीम, लोणचे, सरबते यांसारखे टिकाऊ पदार्थ तयार केले जातात. कच्च्या फणसाची भाजी बनवली जाते. फणसाचे गरे साखरेच्या द्रावणासह हवाबंद डब्यात ठेवून, ते टिकवून, नंतरही खाता येतात. कोकणातील लोक फणसाच्या गऱ्याची पुरी, पोळी, सांदणे तयार करतात. फणसाच्या चिप्सही बनविल्या जातात.

प्रामुख्याने दमट, जास्त पाऊस असणाऱ्या, जास्त आर्द्रता असणाऱ्या कोकण किनारपट्टीत आणि गोव्यात मोठ्या प्रमाणामध्ये फणस मिळतो. सदाहरित फणस मूळचा उष्णकटिबंधीय आशियातीलच आहे.

- अनिल पाटील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com